अँक्शन फॉर टेक्नॉलॉजी यवतमाळ संस्थेच्या वतीने विडा तलावांचे खोलीकरण केल्या मुळे गांवकरी यांनी मानले आभार
रोखठोक न्युज वार्ताहर
अँक्शन फॉर टेक्नॉलॉजी यवतमाळ संस्थेच्या वतीने विडा तलावांचे खोलीकरण केल्या मुळे गांवकरी यांनी आभार मानले तर कामेश वाघमारे व सदाशिव वाघमारे यांच्या पुढाकारातून तलावाचे खोलीकरण झाल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचेही कौतुक केले.
केज तालुक्यातील विडा गावामधे सार्वजनिक गायराना जवळील जून्या तलावांचे पुनरुज्जीवन करुन १२०० लांबीचे अँक्शन फॉर टेक्नॉलॉजी यवतमाळ या संस्थेच्या माध्यमातून गाळ उपसा केल्याने सर्व सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले. याबाबतची सविस्तर माहिती आशी कि, केज तालुक्यातील विडा येथे तलावाचे खोलीकरण अंदाजे खोलीकरण १० फुट व रुंदीकरण १०० फुट व लांबी साधारण दोन्ही बाजूंनी १२०० फुट लांबी करुन तलावातील गाळ उपसा केला, आणि त्यामधे मोठ्या प्रमाणामधे पाण्याचा जास्तीत जास्त साठा कसा होईल व संपूर्ण
गावाला, दलितवस्ती, बौद्धनगर, साठेनगर, झोपडपट्टी घोरपडेवस्ती, कोरडेवाड़ी रोड या सर्व ठिकाणी कस पाणी मुबलक घरोघरी मिळेल यासाठी प्रयत्न करून अंदाजे २ हजार नागरिकांना या तलावाचे पाणी वापरता यावे यासाठी कामेश वाघमारे व सदाशिव (आबा) वाघमारे (उप सरपंच विडा) या दोघांनी अक्शन फॉर रूलर टेक्नोलोजी संस्था यवतमाळ एआरटी यांचे कडू पाटपुरावा करून तलावाची पाणी पातळी कशी वाढेल याचे नियोजन करुन पाणी कस वाढेल हे सर्व गोष्ठी लक्षात घेऊन प्रयत्न करून काम कायम स्वरूपी पिड्यानुपिढ्या काम होणार नाही असे काम करुण घेतले आहे त्याबदल संस्थांचे आभार गावकरी यांच्या वतिने मानले. तर कामेश वाघमारे व सदाशिव वाघमारे यांनी गावातील नागरिकांना उन्हाळ्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केल्याबद्दल गावकऱ्यांनी या दोघांचीही कौतुक केले.