• Sun. Apr 19th, 2026

देवगांव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Bybaba maske

May 4, 2025

देवगांव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

रोखठोक न्युज 

केज दि.३ ( प्रतिनिधी ) तालुक्यातील देवगांव येथे दि.३०एप्रिल बुधवार रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या थाटामाटात आणि उत्साहपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. 

    केज तालुक्यातील देवगांव येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती निमित्ताने दि.३० एप्रिल बुधवार रोजी सकाळी समाज मंदिर याठीकाणी माजी ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार महादेव गायकवाड यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या नंतर महामानव तथागत गौतम बुध्द व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पुजन करुन बुध्दवंदना घेण्यात आली.संध्याकाळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित महिलांनी पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची वाजतगाजत गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणुक ढोलताशाच्या व तालावर तरूणांनी मनमुराद नाचण्याचा आनंद घेतला.मिरवणूक संपल्यानंतर समाज मंदिर याठीकाणी बाहेगावच्या प्रमुख मान्यवरांनी आपले विचार मांडले ही जयंती यशस्वी करण्यासाठी जयंतीचे अध्यक्ष विक्रम वाघमारे,उपाध्यक्ष साहील भैय्या गायकवाड,दैवान कांबळे,अर्जून गायकवाड,बंटी कांबळे,अरुण कांबळे,प्रज्वलीत भैय्या गायकवाड,दत्ता गायकवाड,अजय कांबळे,बापू गायकवाड,बाळू कांबळे,बंडू कांबळे,राणू कांबळे,बुध्दभूषण गायकवाड,कुमार गायकवाड,बापूराव वाघमारे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेऊन ही जयंती साजरी केली.यावेळी नांदूरघाट बीटचे जमादार राजू वाघमारे,राजू वंजारे,मस्के यांनी जयंतीला चोख पोलीस बंदोबस्त दिला.तर पत्रकार अशोक नागरगोजे यांचीही उपस्थिती होती.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!