शहरात पंधरा दिवसापासून पाण्या साठी हाहाकार.
लाज वाटते असे नगरसेवक निवडून दिले!
काँग्रेस,राष्ट्रवादीचे नगरसेवक 60/40 मध्ये खुश!
सत्ताधारी पक्षांतराच्या उड्या मारण्यात मश्गुल.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरात गेल्या पंधरा दिवसा पासुन शहरात नळाला पाणी नाही.केज शहराला धनेगावा येथील मांजरा प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो पण गेल्या पंधरा दिवसांपासून नगरपंचायत कडून पाणी पुरवठा बंद आहे.नगरपंचायत मोटार बिघडल्याचे कारण देत आहे तसेच पाणी मोटार ही लातूर येथे तर आता पुणे,नगर येथे दुरूस्ती साठी घेऊन गेल्याचे सांगत आहेत. पण हे नगरपंचायत चे रडगाणं हमेशा चालू असते यांना कायमचा उपाय करायला काही येत नाही.
सत्ताधारी जनविकास पक्षाला तीन वर्षांत केजचा पाणी प्रश्न सोडवता आला नाही जुने केज सोडले तर नवीन वसाहतीतील आता पर्यंत नगरपंचायतची कुठलीच पाईपलाईन पोहचली नाही फक्त आर्ध्या केजलाच पाणी पुरवठा होता तो सुद्धा यांना करायला जमत नाही.
सत्ताधारी पक्षांतर करण्यात मश्गुल आहे.भाजप,जनविकास, राष्ट्रवादी(शरदपवार)गट आणि आता राष्ट्रवादी (अजित पवार)गट असा हा तीन वर्षांतील उड्या.पण केज शहरात विकासाच्या नावाने फक्त थापा आणि मोठ मोठ्या गप्पा या पलीकडे केजचा विकास नाही.
केजचा विकास कोठे तर जिथे वस्ती नाही तिथे रस्ता हाच काय तो केजचा विकास!
तीन नगरसेवक असलेल्या काँग्रेस चा जनविकास आघाडी ला पाठींबा दिला पण त्यांना सत्तेच व केजच्या नागरीकांच काही देणे घेणे आहे असे कधीच वाटले नाही. हमेशा सत्तेच्या मागे लपलेल्या अवस्थेत काँग्रेस दिसली फक्त 60/40 च्या फॉर्म्युल्या मध्ये चपलकख बसली.”आपणा काम बनता भाड में जाये जनता “हेच काँग्रेस चे ब्रिद वाक्य.
तर विरोधी पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस ही तोंडात मिठाची गुळणी घेऊन सदानकदा बसलेली असती.
शहरात दोन खासदार असताना व सध्या शहरात असताना त्यांनी याची दखल घ्यावी असे जनतेतून बोलले जात आहे.
केज शहरातून निवडून दिलेल्या नगरसेवकांची आता लाज वाटत आहे या शब्दात केजची जनता आता रोष व्यक्त करतान बोलत आहेत.