• Sun. Apr 19th, 2026

जिल्हातील दोन पोलीस अधिकारी रणजित कासले,सुनील नागरगोजे बडतर्फ तर तुरुंग अधिक्षक डी डी कवाळे,महिला शिपाई सिमा गोरे निलंबित. ज्या तुरुंगात वाल्मिक कराड,तिथला धक्कादायक प्रकार रक्ताचे नातेवाईक म्हणून भलतेच कैद्याला भेटून गेले

Bybaba maske

Apr 27, 2025

जिल्हातील दोन पोलीस अधिकारी रणजित कासले,सुनील नागरगोजे बडतर्फ तर तुरुंग अधिक्षक डी डी कवाळे,महिला शिपाई सिमा गोरे निलंबित.

ज्या तुरुंगात वाल्मिक कराड,तिथला धक्कादायक प्रकार

रक्ताचे नातेवाईक म्हणून भलतेच कैद्याला भेटून गेले

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. हे प्रकरण नंतर चांगलेच गाजले. या हत्येनंतर बीडमधील गुंडाराजचे एकापेक्षा एक धक्कादायक अशी प्रकरणं समोर आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा प्रमुख आरोपी असून सध्या तो बीडच्या तुरुंगात आहे. दरम्यान, तो ज्या तुरुंगात आहे, त्याच तुरुंगाबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. कराड असलेल्या कारागृहातील वरिष्ठ तुरूंग अधिकाऱ्याला आणि एका महिला शिपायाला निलंबित करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराड ज्या तुरुंगात आहे, त्याच तुरुंगाचे वरिष्ट अधिकारी डी. डी. कवाळे आणि महिला शिपाई सीमा गोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई करत असताना त्यांच्यावर मोठा ठपका ठेवण्यात आला आहे. रक्ताच्या नातेवाईकांव्यतिरिक्त इतर लोकांना कैद्यांना भेटू दिल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे

तो कैदी नेमका कोण?

गेल्या काही दिवसांपासून याच कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिली जात होती, असा वारंवार आरोप होत होता. एकीकडे हा आरोप होत असतानाच या तुरुंगातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे आणि महिला शिपायाचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे नातेवाईकांव्यतिरिक्त इतर लोकांना भेटू दिलेला ‘तो’ कैदी नेमका कोण? आहे, याबाबत विचारले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून कारागृहातील अधिकाऱ्यांचे निलंबन झालेले नाही. असे असताना बीडच्या तुरुंगाबाबत करण्यात आलेल्या कारवाईला चांगलेच महत्त्व प्राप्त झालेले आहे.

सुरेश धस यांनी केली मोठी मागणी

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या तुरुंगांत ठेवावं अशी मागणी केली जात आहे. बीडच्या तुरुंग प्रशासनाबाबत अनेक तक्रारी निश्चितच आहेत. याबाबतचे काही पुरावे हाती येत आहेत. त्यानंतर आम्ही पुराव्यासहित तक्रार करू, असं सुरेश धस यांनी म्हटलंय. तसेच संतोष देशमुख यांच्या खून्यांना एका जागेवर ठेवू नये ही मागणी आम्ही करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलंय. त्यामुळे आता तुरुंग अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्यामुळे आगामी काळात नेमकं काय?या कडे लागलय लक्ष.

तपासणीत धक्कादायक सत्य आलं समोर

तसेच कारागृहात अनेक त्रुट्या आढळून आल्यानेही ही कारवाई करण्यात आली आहे. कवाळे नामक अधिकाऱ्यांकडे दीड महिन्यांपूर्वी बीड कारागृहाचा तात्पुरता पदभार देण्यात आला होता. यादरम्यान कारागृह महासंचालक कार्यालयातील एका पथकाने बीड कारागृहाची तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान अनेक त्रुट्या आढळून आल्या होत्या. त्यामुळेच पुणे येथील अपर पोलीस महासंचालकांना ही मोठी कारवाई केली. 

सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले याला सेवेतून बडतर्फ होऊन आठवडाही उलटत नाही तोच आणखी एका पोलिस निरीक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षकांना शिवीगाळ करणे, कर्मचाऱ्यांना धमक्या देणे त्यांच्या अंगलट आले.

सुनील नागरगोजे असे बडतर्फ केलेल्या या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. नागरगोजे हे सध्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी बीडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना शिवीगाळ केली होती. तसेच बीड येथेनियुक्ती असताना एका कार्यालयीन कर्मचाऱ्याला धमकी दिली होती. त्यामुळे त्याच्या गैरवर्तणुकीचा अहवाल पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी वरिष्ठांना पाठवला होता. या प्रकरणात पोलिस महासंचालक कार्यालयाने सुनावणी घेतल्यानंतर नागरगोजे यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली

एलसीबीसाठी होता हट्ट

नागरगोजे यांना एलसीबीत पोस्टिंग हवी होती. त्यासाठी त्यांनी राजकीय नेत्यांमार्फत दबावही आणला होता. परंतु, तरीही पोस्टिंग न मिळाल्याने नागरगोजे यांनी एसपींना शिवीगाळ केली होती. त्यानंतर ते आजारी रजेवर होते. आजपर्यंत ते रूजूच झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. नागरगोजे यांची कारकीर्दच वादग्रस्त असल्याने त्यांना थेट खात्यातूनच बडतर्फ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!