• Mon. Aug 24th, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोन वर्षांपासून पाठलाग, धमकावून केले गैरकृत्य; तरुणावर गुन्हा दाखल

Bybaba maske

Aug 20, 2026

 अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोन वर्षांपासून पाठलाग, धमकावून केले गैरकृत्य; तरुणावर गुन्हा दाखल

रोखठोक न्यूज वार्ताहर अंबाजोगाई:

शहरातील मोची गल्ली, सदर बाजार परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ऋतिक देवदत्त चौधरी (रा. अंबाजोगाई) या तरुणावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. मागील दोन वर्षांपासून आरोपी ऋतिक हा पीडितेचा वारंवार पाठलाग करत होता. त्याने जबरदस्तीने तिचा मोबाईल नंबर मिळवला होता. १८ ऑगस्ट रोजी दुपारी त्याने इन्स्टाग्रामवर मेसेज करून तिला रात्री भेटण्यास बोलावले. आरोपीने यापूर्वीही वारंवार धमक्या दिल्यामुळे घाबरलेल्या पीडितेने १९ ऑगस्टच्या पहाटे सव्वा दोन वाजता घराबाहेर पडत दुर्गा माता मंदिराच्या पाठीमागील एका इमारतीत त्याची भेट घेतली.

भेटीदरम्यान आरोपीने पोलीस आपल्या मागावर असून आपण पुण्याला पळून जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने पीडितेला धमकावून व तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केले. या भयंकर प्रकारानंतर अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत पीडितेने घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर कुटुंबाने तातडीने पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली. या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आरोपी ऋतिक देवदत्त चौधरी याच्याविरुद्ध बीएनएस कलम ६४ (१), १३७ (२), ३५१ (२) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४ व ६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास पिंक पथकातील सहा. पोलीस निरिक्षक शेंडगे करत आहेत.

 

 

 

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!