• Sat. Apr 18th, 2026

खासगी पूर्व प्राथमिक शाळांना वेसण ?सात दिवसात नोंदणी बंधनकारक.

Bybaba maske

Apr 26, 2025

खासगी पूर्व प्राथमिक शाळांना वेसण ?सात दिवसात नोंदणी बंधनकारक.

रोखठोक न्युज वार्ताहर 

शासकीय परवानगी आवश्यक नसल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या खासगी पूर्व प्राथमिक शाळांना वेसण घालण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून अशा सर्व शाळांना सात दिवसांत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नर्सरी, प्री स्कूल, ज्यु. केजीसाठी हे बंधन घालण्यात आले आहे. ३ ते ६ या वयोगटातील विद्यार्थी खासगी पूर्व प्राथमिक शाळेत मोठ्या प्रमाणात शिकतात. त्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घेणे आवश्यक नसल्याने अशा शाळा सरसकट सुरू केल्या जातात. त्यासाठी शिक्षक पात्रता व अन्य निकष नाहीत. त्याचा गैरफायदा घेत तगडे शुल्क आकारून पैसे कमवले जात असल्याचे समोर आले आहे. त्यावर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या शाळांची अधिकृत माहिती शिक्षण विभागाकडे असणे आवश्यक असल्याचे यासंदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे. शासकीय व स्थानिक स्वराज्य

संस्थांच्या बालवाड्यांची नोंद महिला व बाल विकास विभागाकडे उपलब्ध असते. मात्र खासगी केंद्राची माहिती शासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे आता खासगी पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी प्री स्कूल रजिस्ट्रेशन या पोर्टलवर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अशा खाजगी केंद्राची सर्वसाधारण माहिती, विद्यार्थी संख्या, व्यवस्थापन समिती, भौतिक सुविधा, कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ही माहिती पोर्टलवर सादर करायची आहे.

सात दिवसात नोंदणी बंधनकारक

खासगी पूर्व प्राथमिक शाळांची संख्या राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यास आळा घालणे क्रमप्राप्त आहे. तसेच आता नवे शिक्षण धोरण लागू झाले असून त्यात या टप्प्यातील बालकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रत्येक बालकास लवकरात लवकर मोफत, सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि वैकल्पिकदृष्ट्या सुयोग्य वातावरण देणारे शिक्षण सहज मिळायला हवे. डॉ. पंकज राजेश भोयर, राज्यमंत्री, शालेय शिक्षण.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!