• Sun. Apr 19th, 2026

झेंडा लावण्याचा कारणावरून पोलिसासमोरच तुफान राडा. दोन गट आमने सामने भिडले,एकमेकांची डोके फोडली.

Bybaba maske

Apr 25, 2025

झेंडा लावण्याचा कारणावरून पोलिसासमोरच तुफान राडा.

दोन गट आमने सामने भिडले,एकमेकांची डोके फोडली.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही महिन्यापूर्वीच महाराष्ट्राला हादरवणारं संतोष देशमुख हत्याकांड घडलं. यानंतर गुन्हेगारीच्या विविध घटना समोर आल्या. त्यामुळे महाराष्ट्रात बीडची ओळख गुन्हेगारी जिल्हा म्हणून बनताना दिसत आहे.

आष्टी तालुक्यातील खडकत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती २० एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात परंतु खडकत येथील एका चौकामध्ये निळा झेंडा लावल्याने काही लोकांनी त्यावर आक्षेप घेत विरोध केला, पोलिसांना व तहसीलदार याना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन दोन्ही झेंडे सन्मानपूर्वक काढण्यात परंतु अचानक झेंडा काढण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील खडकत येथे दोन गट आपसात भिडले आहेत. जवळपास २५०-३०० तरुणांनी रस्त्यावर उतरून एकमेकांच्या दिशेनं दगडफेक केली आहे. यावेळी काहींनी हातात लाकडी दांडे आणि इतर शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचा देखील प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तुफान दगडफेकीत काहीजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी आष्टीच्या खडकत गावातील एका चौकात झेंडा लावण्यावरून वाद झाला होता. हा वाद झाल्यानंतर गुरुवारी दुपारी घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी संबंधित झेंडा चौकातून काढून टाकला. यावेळी दोन गटात तणाव निर्माण होऊन त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली.

गुरुवारी झालेल्या वादाचे पडसाद आज शुक्रवारी देखील बघायला मिळाले. दोन्ही बाजुने झालेल्या दगडफेकीमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या दगडफेकीमध्ये महिलांनाही मार लागला असून, दलित वस्तीवर गावातल्या व इतरच्या आसपासच्या गावातील लोकांनी दगडफेक करत महिला सह मुलांना देखील मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांनी खडकत येथे जाऊन समाज बांधवांना शांत राहण्याचे आवाहन करत,जे विद्यार्थी युवक या दगडफेकीत किंवा भांडणांमध्ये सामील नव्हते तरी त्यांना पोलीस ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!