• Sun. Apr 19th, 2026

महालक्ष्मी कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा. दहा महिलांची सुटका,कला केंद्राचा मॅनेजर पोलिसांच्या ताब्यात.

Bybaba maske

Apr 25, 2025

महालक्ष्मी कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा.

दहा महिलांची सुटका,कला केंद्राचा मॅनेजर पोलिसांच्या ताब्यात.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड दिनांक २३/०४/२०२५ रोजी केज तालुक्यातील महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतीक कला केंद्र, उमरी शिवार येथे सदर कला केंद्राचे चालक, मालक व मॅनेजर हे काही महीलांकडून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करीत असल्याची गोपनीय माहीती मिळाली होती. त्यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (भा.पो.से.)यांनी नियंत्रण कक्षाचे सपोनि मधुसुदन घुगे, अनैतीक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या सपोनि श्रीमती वर्षा व्हगाडे व त्यांचे पथकाला सदर ठिकाणी छापा टाकण्याचे आदेशीत केले. त्यावरुन सदर पथकाने आज दिनांक २४/०४/२०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक डमी ग्राहक व दोन पंचांसह सदर ठिकाणी सापळा रचून छापा टाकला असता सदर ठिकाणी महालक्ष्मी कला केंद्राचा मॅनेजर हा सदर कला केंद्रात १० महीलांकडून स्वतःचे आर्थीक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करवून घेतांना मिळून आला.सदर ठिकाणाहून १० पिडीत महीलांची सुटका करण्यात आली असून सदर कला केंद्राचा मॅनेजर मयूर बाबुराव अंधारे यास ताब्यात घेण्यात आले आहे. सपोनि मधूसुदन घुगे यांचे फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन केज येथे १) महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतीक कला केंद्राचे मालक १) सत्वशीला बाबासाहेब अंधारे रा. स्वरसंगम कॉलनी, बीड, ह.मु. सावंतवाडी (उमरी) ता. केज जि. बीड, महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतीक कला केंद्र चालवणारे २) आदित्य सत्वशीला अंधारे, रा. स्वरसंगम कॉलनी, बीड, ह.मु. सावंतवाडी (उमरी) ता. केज जि. बीड, महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतीक कला केंद्राचे मॅनेजर ३) मयूर बाबुराव अंधारे रा. उदयनगर, धारुर ता. धारुर यांचेविरुद्ध गु.र.नं. १८६/२०२५ कलम ३,४,५,६ स्त्रीया व मुली अनैतीक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६, कलम १४३ भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (भा.पो.से.) यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मधुसुदन घुगे नियंत्रण कक्ष, स.पो.नि. वर्षा व्हगाडे अनैतीक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष, पो.ह./१६८२ बहीरवाळ नेमणूक पिंपळनेर पो.स्टे., पो.ह./२४२ शिंदे नेम. अ.मा.व्या. प्र. कक्ष, पोना/२३४ अविनाश घुंगर्ड, पोशि/१९२७ शुभम घुले, मपोशि/६३ अर्चना वंजारे, मपोशि/१८७६ भाग्यश्री खांडेकर नेमणूक आर.सी.पी. यांनी केली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!