• Sun. Apr 19th, 2026

गतिरोधक नसल्याने नाहक बळी.  आ.नमिता मुंदडा यांनी लक्ष घालावे.

Bybaba maske

Jun 12, 2025

गतिरोधक नसल्याने नाहक बळी. 

आ.नमिता मुंदडा यांनी लक्ष घालावे.

रोखठोक न्युज वार्ताहर

केज शहरातून जाणाऱ्या बीड-अंबाजोगाई रस्त्यावर गतिरोधक असणे खूप गरजेचे झाले असून या रहदारीच्या मुख्य रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे.रस्त्यावरून प्रवास करताना अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. या रस्त्याच्या उतारालगत दुकाने, कार्यालये आहेत.उताराचा रस्ता ओलांडत असताना जीव मुठीत घेऊन नागरिक रस्ता ओलांडत आहेत

मागच्याच आठवड्यात पंचायत समितीचे माजी सभापती नारायण घुले यांचे अपघातात निधन झाले.

शहरातील मधुबन हाॅटेल पासून ते छ. शिवाजी महाराज चौका पर्यंत रस्ता हा उताराचा असून कुठे ही गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगात येतात त्याच मुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. मधुबन हाॅटेल, शिक्षक काॅलनी,डॉक्टर चाटे हॉस्पिटलसमोर, न्यायालया समोर,तहसील कार्यालय समोर गतिरोधक असने गरजेचे झाले आहे.तसेच उपजिल्हा रुग्णालय ते भवानी चौका पर्यंत गतिरोधक असने गरजेचे आहे.

अंबाजोगाई येथे गतिरोधक होऊ शकतात तर मग केज शहरात का होऊ शकत नाहीत? असा प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे.

आता या प्रश्नावर आमदार नमिता मुंदडा यांनी मार्ग काढवा अशी शहरातील जनतेतून मागणी होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!