• Sun. Sep 20th, 2026

पाच दिवसात स्त्री अत्याचाराच्या पाच घटना, चार घटनेत गुन्हे दाखल मात्र विद्यार्थिनीची छेड प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही.

Bybaba maske

Jul 12, 2025

पाच दिवसात स्त्री अत्याचाराच्या पाच घटना, चार घटनेत गुन्हे दाखल मात्र विद्यार्थिनीची छेड प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही.

 

रोखठोक न्यूज/ गौतम बचुटे 

केज तालुक्यात दि.२ जुलै ते 7 जुलै या पाच दिवसात महिला अत्याचाराच्या आणि लैंगिक शोषणाच्या पाच घटना उघडकीस आलेल्या आहे. या पाच घटनातील दोन पीडित तरुणी या दिव्यांग आणि गतिमंद आहे तर या पैकी एक अल्पवयीन आहे. तर उर्वरित तीन पीडिता या शालेय विद्यार्थिनी आहेत. या पाच घटनेतील चार घटनेत गुन्हे दाखल झालेले असून एका घटनेत मात्र अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.

या महिला आणि अल्पवीन शाळकरी मुलींच्या अत्याचाराच्यापहिल्या घटनेत आरोपी सराईत असून त्याने अशाच प्रकारच्या गुन्ह्यात शिक्षा झालेली आहे. तर आणखी एका गुन्ह्यात त्याच्याविरुद्ध प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.दुसऱ्या घटनेत तर एका शिक्षकाने सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलींची छेड काढली, परंतु या घटनेला आठ दिवस उलटूनही ना त्या शिक्षकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ना त्याच्यावर शिक्षण विभागाने कारवाई केली. तिसऱ्या व चौथ्या दोन वेगवेगळ्या घटनेत आरोपी बाप लेक आहेत. पाचव्या गुन्ह्यातील आरोपी हा ट्रॅक्टर चालविणारा तरूण आहे.

लैंगिक अत्याचार व छेडछाडीच्या घटना

१ दि.२ जुलै रोजी एका गतिमंद तरुणीवर नानासाहेब चौरे गोठ्यात लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ३५६/२०२५ भा. न्या. सं. ६४ (२) (के), ६४(२) (आय), ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल झालेला आहे.

२ दि.३ जुलै २०२५ रोजी गुरुवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान शाळेच्या मध्यंतर वेळी कॅरम खेळत असलेल्या सहावीच्या मुलींच्या अंगाला शिक्षक बाबासाहेब कांबळे याने वाईट हेतूने स्पर्श केला आणि त्यांच्याशी तुमचे नवरे निवडा. अशा प्रकारे बोलून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर एका मुलीनी हा प्रकार घरी तिच्या पालकांना सांगितल्या नंतर दि.८ जुलै रोजी एका पालकाने गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या बाबतची लेखी तक्रार त्यांना सादर केली. मात्र या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.

३ दि.४ जुलै रोजी दुपारी ३ च्या सुमारास एका दिव्यांग आणि गतिमंद असलेली तरुणी ही घरात एकटीच असताना बाळू कांबळे याने तिचा विनयभंग केला. त्याच्या विरुद्ध गु.र.नं.३६०/२०२५ भा. न्या. सं.७४ (के), ३३३ यासह अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम ९२ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

४ दि.४ जुलै रोजी निखिल कांबळे याने नववीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचा मोटार सायकलवरून पाठलाग करीत तीचा विनयभंग केला. निखिल कांबळे आणि त्याची आई याच्याविरुद्ध गु.र.नं.३६२/२०२५ भा. न्या.सं. ७८ (१), ११५ (२), ३५१(२), ३५१(३), ३५२, यासह पोक्सो कलम ४, १२ नुसार गुन्हा दाखल झालेला आहे

५ दि.७ जुलै रोजी ऋषिकेश उर्फ सचिन गलांडे याने १० वीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करून परीक्षेला न बसू देण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली. म्हणून त्याच्या विरुद्ध गु.र.नं.३६७/२०२५ भा. न्या. सं.७४, ७८, १२६ (२) यासह पोक्सो कलम ८, १२ नुसार गुन्हा दाखल झालेला आहे

baba maske

Related Post

विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!