जयभीम नगर व सम्राट नगर च्या रस्त्यांची दयनीय अवस्था.
मोरेवाडी ग्रामपंचायत फक्त टॅक्स घेते का?
जागोजागी पाणीपुरवठा करणारे पाईपलाइन फुटली आहे.
रोखठोक न्यूज वार्ताहर
मोरेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जयभीम नगर व सम्राट नगर मधील रस्त्याची अवस्था एकदम दयनीय झाली असून चालने सुद्धा अवघड झाले आहे.मोटारसायकल,स्कुटी वरून जाणारे नागरिक स्लीप होऊन पडत आहेत त्यात कोणाचा पाय तर कोणाचा हाथ फॅक्चर होत आहे.वृद्ध नागरिक बाहेर निघू शकत नाहीत ऐवढी दयनीय परिस्थिती आहे.बौद्ध धर्मियांचे पंचशिल बौद्ध विहार व सम्राट अशोक बौद्ध विहार असे श्रद्धास्थान असलेले मार्गावरील जाणारा हा मुख्य रस्ता आहे हाच रस्ता पुर्ण जलमय अवस्थेत आहे.त्यामुळे हा रस्ता दलित वस्ती म्हणून प्राधान्यक्रम देऊन लवकरात लवकर करावा असे नागरिकांचे म्हणे आहे.त्या साठी सम्राट नगर येथील नागरिकांची मोरेवाडी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करण्याची तयारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.त्याच बरोबर या भागात पाणी पुरवठा करण्या साठी जी पाईपलाइन टाकण्यात आली आहे ती जागोजागी फुटल्याने त्याचे पाणी ही रस्त्यावर येऊन मोठमोठे खड्डे झाले आहेत व पिण्या साठी येणारे पाणी अशुद्ध येत आसल्याने नागरिक आजारी पडत आहेत त्यामुळेच या पाईपलाइन ची दुरूस्ती होणे गरजेच आहे.यावर वेळीच मोरेवाडी ग्रामपंचायत ने पाऊल उचलले नाहीतर नागरिकांना उपोषणा शिवाय पर्याय नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
