• Fri. Sep 11th, 2026

आवादा कंपनीच्या विरोधात उपोषण करणाऱ्या महिलेचा उपोषणस्थळी मृत्यू. आवदा कंपनी नागरिकांसाठी शाप ठरू लागली.

Bybaba maske

Jul 25, 2025

आवादा कंपनीच्या विरोधात उपोषण करणाऱ्या महिलेचा उपोषणस्थळी मृत्यू.

आवदा कंपनी नागरिकांसाठी शाप ठरू लागली.

रोखठोक न्यूज वार्ताहर 

केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुना नंतर चर्चेत आलेली आवादा कंपनी पुन्हा चर्चेत आली आहे.आज परत या कंपनीच्या मनमानी विरोधात उपोषण करणारी सुभाबाई गोपाळ भोसले या महिलेचा उपोषण स्थळीच मृत्यू झाला आहे.

केज शहरा लगत काही शेतकऱ्यांच्या वहितीच्या जमीन आहेत याच जमिनीवर अवादा कंपनीकडून पोल लावले जात आहेत त्या विरोधात दहा ते बारा नागरिक उपोषण करत आहेत.अवादा कंपनीची मनमानी ने व स्थानिक गुंडाची मदत घेऊन यांच्या शेतात खांबे लावत होते व उपोषण कर्त्यानां विचारात न घेता किंवा परवानगीशिवाय हे अनधिकृत खांब लावले जात होते तसेच वहिती जमीन कमी असल्याने जर खांबे लावले तर जमीन वहिती साठी कमी होईल त्या साठी दहा ते बारा जण दोन दिवसापासून केज तहसील कार्यालय समोर उपोषणास बसले आहेत त्या पैकी आज सुभाबाई गोपाळ भोसले वय 58 यांचे उपोषण स्थळीच मृत्यू झाला आहे.आजून ही प्रशासन उपोषण स्थळी कोणीच आले नाही.

baba maske

Related Post

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!