• Sun. Apr 19th, 2026

मोकाट जनावरां मुळे अपघात होण्याची शक्यता  मोकाट जनावरे मेन रोड च्या मधुमद बसण्यामुळे वाहतूकीस अडथळ नगरपरिषद प्रशासनाने मोकाट जनावरां चा बंदोबस्त करावा 

Bybaba maske

Jul 30, 2025

मोकाट जनावरां मुळे अपघात होण्याची शक्यता. 

मोकाट जनावरे मेन रोड च्या मधुमद बसण्यामुळे वाहतूकीस अडथळ नगरपरिषद प्रशासनाने मोकाट जनावरां चा बंदोबस्त करावा 

रोखठोक न्यूज अंबाजोगाई प्रतिनिधी

अंबाजोगाई शहरातील मेन रोड यशवंतराव चौक राजीव गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक व सावरकर चौक बस स्थानका कडे नेहमी वाहतूक वर्दळीच्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे वावरतात त्यामुळे रस्त्यावरून जाताना लहान मुले महिला पुरुष यांना खूप त्रास होतो. मोकाट जनावरे हे रस्त्याच्या मधोमध उभे राहतात तर कधी कधी रस्त्याच्या मधोमध बसतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. मोकाट जनावराच्या कधीकधी झुंजही लागतात त्यामुळे महिला , पुरुष , शाळकरी मुलांना रस्त्यावरून जाताना जीव मोठी धरून चालावे लागते. रस्त्यावरील जनावरामुळे वाहतूक व्यवस्थेस खूप मोठी अडचण होते . तरी या जनावरचा बंदोबस्त करून जनावरांना कोंडवाड्या त टाकावे अशी मागणी नागरिक करत आहेत.सविस्तर वृत्त असे की अंबाजोगाई शहरांमध्ये प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक गल्लीमध्ये मोकाट जनावरांचा जास्त प्रमाणात जमावं होतो आहे या जनावराच्या जमावंमुळे सर्वसामान्य नागरिक, शाळकरी मुले महिला यांना खूप त्रास होतो कधी कधी भर रस्त्यावर जनावरांची झुंज लागते यामुळे शाळकरी मुलांना आपला जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागते. मोकाट जनावरे भर रस्त्यावर बसतात यामुळे वाहतुकीची अडचण होते. अंबाजोगाई शहरातील मोंढा मार्केट मंगळवार आठवडी बाजार रविवार शुक्रवार या दिवशी खूप मोठा बाजार असल्यामुळे बाजारामध्ये मोठी गर्दी असते या गर्दीमध्ये सुद्धा मोकाट जनावरे बाजारामध्ये फिरतात यामुळे बाजार करणाऱ्या महिला पुरुषांना सुद्धा खूप त्रास होतो‌.तरी 

नगरपरिषद प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून जनावरांना कोंडवाड्यात टाकावे

 मोकाट जनावरे जास्त प्रमाणात वाढलेआहेत यामुळे नागरिकांना त्रास होतो हा त्रास होऊ नये यासाठी नगरपरिषद प्रशासनाने जनावरांना कोंडवाड्यात टाकून जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अंबाजोगाई शहरातील नागरीक करत आहेत

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!