• Wed. Jun 3rd, 2026

घोटाळे बाज विष्णु घुले यांना निवडणूकीत पाडणारच. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रीया. दलितांची गायरान जमीन बळकावली. जलजिवन मध्ये घोटाळा केला!

Bybaba maske

Jul 31, 2025

घोटाळे बाज विष्णु घुले यांना निवडणूकीत पाडणारच.

नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रीया.

दलितांची गायरान जमीन बळकावली.

जलजिवन मध्ये घोटाळा केला!

रोखठोक न्यूज वार्ताहर 

बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद चे बिगुल वाजले तसे हवसे गवसे निवडणूकीची तयारी करू लागले त्याच प्रकारे केज तालुक्यात सुद्धा रणधुमाळी बघायला मिळत आहे.जिल्हा परिषदे चे सहा गण असून यात चुरस रंगणार आहे.त्याच प्रमाणे चिंचोली सर्कल व येवता सर्कल मधून भाजप चे विष्णु घुले जिल्हा परिषद इच्छुक आहेत.पण चिंचोली सर्कलमधी जलजिवन चा कोटीचा घोटाळा केल्याने तेथील नागरिक त्यांच्यावर नाराज आहेत त्यामुळेच ते येवता जिल्हा परिषद गटाचा कानोसा घेत आहेत पण तेथील नागरिक सुद्धा असा घोटाळेबाज माणूस नको अश्याच प्रतिक्रिया त्या येवता गटातील नागरिक चर्चा करत आहेत.येवता गटात त्यांचे स्वतःचे टाकळी गाव असल्याने त्यांना लढाई सोपी वाटत आहे पण याच टाकळी गावाने त्यांना ग्रामपंचायत मध्ये धुळ चारली असल्याने गावच त्यांच्या पाठी मागे नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे फक्त टाकळी गावावर विसंबून असलेले त्यांचे राजकारण दिसून येत आहे. 

शाळेच्या नावावर आपल्या राजकीय ताकदिवर शहरातील चार एकर मोक्याची जागा त्यांनी बळकावली आहे.भूमिहीन दलित असलेले या जागेवर दलितांचा हक्क असताना ती शाळेच्या नावाने बळकावल्याने दलित ही त्यांच्यावर नाराज आहेत. फक्त पैश्यांच्या जोरावर राजकारण करणाऱ्या विष्णु घुले यांना या निवडणूकीत जागा दाखवायचीच असे आता जनतेतून बोलले जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!