• Thu. Sep 10th, 2026

अंबाजोगाईत मोकाट जनावरांचा ठिय्या; न.प. प्रशासनाचे दुर्लक्ष

Bybaba maske

Aug 2, 2025

अंबाजोगाईत मोकाट जनावरांचा ठिय्या; न.प. प्रशासनाचे दुर्लक्ष

अंबाजोगाई प्रतिनिधी 

अंबाजोगाई शहरात मोकाट जनावरे वरदळीच्या ठिकाणी भर रसत्यात मधोमध बसत असल्यामुळे,अपघात होण्याची दाट शक्यता आहे. जर करीता नजर चुकीने अपघात झालाच् तर पोलिस प्रशासनाची परत- परत तीच धावपळ, पोलिस पंचनामा, रस्त्यावर जमाव, अशा अनेक समस्यांना रसत्यावरील नागरीकांना तोंड देण्याची वेळ येऊ शकते. शहरातील मुख्य ठिकाणे जसे की बसस्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक,मोरेवाडी,पाण्याची टाकी,,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, अण्णा भाऊ साठे चौक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते.अशा मोकाट बेवारस जनावरामुळे एखादा जीव घेणे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा बेवारस मोकाट जनावरांना न.प.प्रशासन कोंडवाड्यात का घालु शकत नाही. असा सवाल अंबाजोगाई शहरातील नागरीक उपस्थित करत आहेत. न.प.प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन वाहतुकीस अडथळा होणाऱ्या अशा मोकाट जनावराचा बंदोबस्त करण्यांत यावा ही मोकाट जनावरे कोंडवाड्यात टाकावे अशी मागणी रसत्यावरुन ये – जा करणाऱ्या अंबाजोगाई नागरीकांची होत आहे.       

 चौकट 

डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते श्री संत भगवान बाबा चौका पर्यंत शाळा कॉलेज हॉस्टेल ट्युशन एरिया असल्यामुळे या रस्त्यावर शाळकरी मुलं-मुली जास्त प्रमाणामध्ये ये जा करतात मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेले असतात म्हणून अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही न प प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये अशा मोकाट जनावराचा बंदोबस्त करावा अशी मागणी अंबाजोगाई नागरिकांतून होत आहे

baba maske

Related Post

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!