केजच्या अतिक्रमणा बाबत तहसीलदार,नगरपंचायत,सार्वजनिक बांधकाम, पोलीस यांची डोळेझाक.
अतिक्रमण धारकांना तहसीलदार पाठीशी घालत असल्याचा आरोप.
मोक्याच्या शासकीय जागेवर अतिक्रमण तरी प्रशासन गप्प गार!!
रोखठोक न्यूज वार्ताहर
केज शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न तहसील प्रशासन,नगरपंचायत,सार्वजनिक बांधकाम व पोलिस प्रशासना मुळे वरच्या वर जटील बनत आहे.मोक्याच्या असलेल्या जागा ह्या शासकीय जागा आहेत त्या मध्ये प्रामुख्याने हे फलोत्पादन विभाग, पंचायत समिती समोरील,तहसील समोरील,पोलिस स्टेशन समोरील, पशुवैद्यकीय दवाखाना समोरील,जिल्हा परिषद शाळा कंळब रोड लगत,बस स्थानक समोरील ही सर्व मोक्याच्या जागा सरकारी अखत्यारीत येते.
प्रत्येक वर्षाला अतिक्रमण उठवन्याच नाटक तहसील प्रशासन,नगरपंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन करत आणि आठच दिवसात अतिक्रमण “जयसे थे “होत. त्यानंतर अतिक्रमणा कडे लक्ष दिल जात नाही. पुन्हा या कडे ढुंकूनी ही पाहीले जात नाही. ही अतिक्रमणीत जागा एखाद्या वेळेस गरीब व्यावसायिक आपले पोट भरत असतील तर मान्य आहे, पण या जागेचे वडिलोपार्जित आपलीच जागा आहे या अविर्भावात या अतिक्रमणीत जागा भाड्याने देऊन त्या जागेच काही लोक भाडे खात आहेत त्यातूनच काही हिस्सा प्रशासनाकडे येतो की काय हा प्रश्न उत्पन्न होत आहे. कारण ज्या वेळेस अतिक्रमण उठवले जाते त्या नंतर तेच अतिक्रमण पुन्हा आठ दिवसांत तेथे बसलेले असते, फक्त बसलेले असते अशे नाहीच तर पहिल्या जागे पेक्षा दुप्पट सरकारी जागा त्यांनी बळकावलेली असते, अतिक्रमण उठवल्या नंतर ही आठ दिवसांत दुप्पट जागेवर केेलेल्या अतिक्रमणा कडे प्रशासन डोळेझाक करते त्याच मुळे संशय उत्पन्न होतो की अतिक्रमण धारक व तहसील प्रशासन,नगरपंचायत,सार्वजनिक बांधकाम व पोलिस प्रशासन यांची मिली भगत आहे का? कारण तहसीलदार जर या अतिक्रमणा कर कानाडोळा करत असतेल तर का ? कारण अतिक्रमणी पूर्ण जागा ही शासकीय आहे मघ ऐवढी तहसीलदार यांना उदासिनता का? कारण या जागा शासनाने ताब्यात घेवून गाळे काढून किरायाने दिले तर व्यावसायिकांना कमी भाड्यात जागा मिळेल.बसस्थानका समोर फलोत्पादन जागेवर पार्किंग साठी जागा उपलब्ध होईल त्यामुळे रहदारीचा प्रश्न मिटेल तिच परिस्थिती, तहसील कार्यालय,पंचायत समितीसमोर पार्किंग नसल्याने अतिक्रमण काढले तर तेथे पार्किंग ची सोय होऊ शकते.
केज शहरात पार्किंग साठी जागा नसल्याने अव्यवस्थित पार्किंग केलेले असते ती हाटवण्या मध्ये दिवस भर पोलीस प्रशासनाची दमछाक होत असते मग या वर कायम स्वरूपी विलाज शासकीय जागेवर चे अतिक्रमण हाटवून त्या जागेवर प्रशस्त पार्किंग करावी व शहराला गर्दी मुक्त करावे .
हे सगळे साध्य होईल ज्या वेळेस तहसीलदार व पोलिस प्रशासन लक्ष घालेल असे केजची जनता म्हणत आहे
