• Sun. Apr 19th, 2026

केज तालुक्यातील रेणूका कला केंद्रावर पुन्हा पोलिसांची धाड ! परप्रांतीय वेश्यांची सुटका करून कला केंद्राचा मालक आणि इतर दोघांवर कारवाई मालक फरार तर मॅनेजर आणि पार्टी मालकीण पोलिसांच्या ताब्यात !

Bybaba maske

Aug 6, 2025

केज तालुक्यातील रेणूका कला केंद्रावर पुन्हा पोलिसांची धाड!

परप्रांतीय वेश्यांची सुटका करून कला केंद्राचा मालक आणि इतर दोघांवर कारवाई

मालक फरार तर मॅनेजर आणि पार्टी मालकीण पोलिसांच्या ताब्यात !

रोखठोक न्यूज 

गौतम बचुटे/केज :- लोकनाट्य तमाशाच्या नावाखाली केज तालुक्यात सारूळ फाटा येथे सुरू असलेल्या कला केंद्रावर गुजरात राज्यातील वेशा बोलावून वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून कला केंद्राचा मालक आणि इतर दोघांना ताब्यात घेत त्या महिलांची सुटका केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज मांजरसुंबा हायवे वर असलेल्या केज तालुक्यातील सारूळ फाटा येथील रेणूका कला केंद्रात लोकनाट्य तमाशाच्या नावाखाली वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

त्या मिळालेल्या माहिती वरून दि. ५ ऑगस्ट रोजी रात्री ८:०० च्या सुमारास बीड येथील अनैतिक मानवी वाहतूक शाखेने जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने अनैतिक वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक, देवीदास भागवत गात, पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मिरा रेडेकर, महिला पोलिस आशा चौरे, शोभा जाधव, हेडकॉन्स्टेबल शिंदे, येवले, वीर आणि वाहन चालक निर्धार यांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून धाड टाकली. त्यावेळी बनावट गिऱ्हाईकसह त्या ठिकाणी गुजरात राज्यातील एक वर्षीय ३२ तरुणी आणि तिच्या सोबत असलेली ३० वर्षीय तरुणी आढळून आली.

पोलिसांनी त्या दोघींचे जवाब नोंदवून त्यांची सुटका केली आणि रेणुका कला केंद्राचा मालक रामनाथ ढाकणे, मॅनेजर शेख शफीक शेख हमीद, आणि पार्टीची मालकीण मिना संतोष खराडे यांच्या विरुद्ध पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात गु र नं ४२६/२०२५ अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५,६ यासह भा. न्या. सं.१४३(२),१४३(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचा तपास पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे हे तपास करीत आहेत.

मॅनेजर आणि पार्टी मालकीण पोलिसांच्या ताब्यात मात्र मालक फरार :- पोलिसांनी केलेल्या कारवाईत कला केंद्राचा मॅनेजर शेख शफीक शेख हमीद, आणि पार्टीची मालकीण मिना संतोष खराडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मात्र रेणुका कला केंद्राचा मालक रामनाथ ढाकणे हा फरार असून पोलिस त्याचा तपास घेत आहेत.

अनेक कारणांनी बदनाम असलेले कला केंद्र :- रेणुका कला केंद्र हे अनेक कारणांनी बदनाम झालेले आहे.

१) २७ जानेवारी २०१९ मध्ये याच रेणुका कला केंद्रावर पोलिसांनी छापा टाकून १६ जणांना ताब्यात घेऊन महिलांची सुटका करण्यात करण्यात आली होती. कला केंद्राचा रामनाथ ढाकणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

२) या कला केंद्रात काम करीत असलेली शितल कांबळे हिचा बरड फाट्यावरील राजयोग लॉज मध्ये नेवून खून केला तो तो खून तत्कालीन सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी सुमारे दोन महिन्या नंतर उघडकीस आणून रामनाथ ढाकणे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला होता.

३) या कला केंद्रात नर्तकी म्हणून काम करीत असलेला तृतीय पंथी गार्गी ढलपे हिने मस्साजोग येथील अजिंक्य लॉज मध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!