• Sat. Apr 25th, 2026

केज तहसील प्रशासन हे सत्तेची रांड झाली का? उपोषण कर्ते कपिल मस्के यांना मारायचा घाट घातलाय का?

Bybaba maske

Aug 13, 2025

केज तहसील प्रशासन हे सत्तेची रांड झाली का?

उपोषण कर्ते कपिल मस्के यांना मारायचा घाट घातलाय का?

रोखठोक न्यूज वार्ताहर 

केज तहसील प्रशासन हे सत्तेची रांड झाली का? हा प्रश्न जर नामदेव ढसाळ जिंवत असते तर हा त्यांनी विद्रोही कवितेतून विचारलेला सवाल आज केज तहसील प्रशासन यांना लागु झाला असता!

केज तहसील समोर गेल्या तीन दिवसांपासून उपोषण करते मा.नगरसेवक कपिल मस्के हे उपोषण करत आहेत प्रामुख्याने तहसील प्रशासन व नगरपंचायत प्रशासन यांच्या विरोधात हा यलगार आहे. कित्तेक महिन्या पासून 30/1 व 30/2 या गायरान जमीन बाबतीत हा लढा कपिल मस्के हे लढत आहेत. यात 30/1 व30/2 ही गायरान जमीन दलितांना वहिती साठी शासनाने दिली होती या वर मातंग समाजातील भानुदास लांडगे व त्यांचे तत्सम मुले, चुलत मुले हे वहिती करत होते ही जमीन बीड-अंबाजोगाई या रोडवर असलेली जमीन असून यांचे बाजारमुल्य आज घडीला करोडो रूपायचे आहे. याच जमिनीवर केज शहराचे जनविकास आघाडीचे सर्वेसर्वा म्हणून ज्यांचा उल्लेख होतो तेच जनविकास इन्फ्रास्ट्रक्चर चे सर्वेसर्वा हारून इनामदार यांची नजर या जमिनीवर पडली. पण या अगोदर उमर फारोख या व्यक्ती ने ही 30/1 ही जमीन लांडगे कंपनीकडून अदलाबदल केली, अदलाबदलीत केज शहरा लगत रोड टच ज्याचा भाव आज घडीला करोडो रूपयात मोजला जातो त्यांना येवता सारख्या केज शहरा पासून 30 किलोमीटर अंतरावर एकदम दुर्दम्य ठिकाणी गायरान जमीन देऊन अदलाबदल केली.त्यानंतर केज शहरातील हिच मोक्याची जाग जनविकास इन्फ्रास्ट्रक्चर हारून इनामदार सर्वेसर्वा असलेल्या कंपनीला विकण्यात आली त्या नंतर सगळी रोड टच जमीन आपल्या अखत्यारीत रहावी म्हणून आपल्या संस्थेत कर्मचारी असलेल्या व जन विकास चे सचिव असलेले अशोक सोनवने, भाजप तालुकाध्यक्ष भगवान केदार, भाजपचे पदाधिकारी सुनील घोळवे व नगराध्यक्ष असलेले सिता बनसोड यांना विकली.या बाबत उमर फारुकी यानी व कपिल मस्के यांनी अपिल केले आहे पण यात न्याय भेटला नाही.यात त्या काळातील तत्कालीन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांची चौकशी होने अपेक्षित आहे व त्यांच्या संपत्ती ची चौकशी होणे हे सुद्धा अपेक्षित आहे.

पण आज ही कपिल मस्के हे न्याया साठी केज तहसील समोर गेल्या तीन दिवसांपासून उपोषण करत आहेत कारण-39/2 या गायरान जमिनीवर 2011 पासून दलित नागरिक आपली वस्ती करून राहत आहेत तीच वस्ती आज प्रशासनाला हाताशी धरून या जागेवर कब्जा करायची मानसिक ता झाली आहे,असे आरोप कपिल मस्के यांनी केले आहेत.

त्याच मुळे दलित नेते कपिल मस्के यांना आज प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण सारखे प्राण घातक हत्यार उपसावे लागत असेल व प्रशासन त्यांच्या कडे गेल्या तीन दिवसांपासून दुर्लक्ष करत असेल तर मग नामदेव ढसाळ यांची कविता हि सत्ता सरकारची रांड झाली का? हा प्रश्न पुन्हा एकदा प्रशासन च विचारा लागतो.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!