डाॅल्बी मुक्त अंबाजोगाई होऊ शकते तर केज का नाही?
फक्त इच्छा शक्ति ची गरज!!
रोखठोक न्यूज वार्ताहर
काल अंबाजोगाई शहरात शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस प्रशासनाकडून एक धाडसी निर्णय घेण्यात आला येत्या गणेश उत्सवात डाॅल्बी मुक्त उत्सव पार पाडणार या मुळे अतिशय शांत असणाऱ्या अंबाजोगाई च्या नागरिकांकडून याचे स्वागत झाले व पोलिस प्रशासनचे कौतुक तसेच अभिनंदन होऊ लागले.
अत्यंत कर्णकर्कश व मानवी शरीरास घातक अश्या डाॅल्बी स केज मध्ये अंबाजोगाई सारखा डाॅल्बी मुक्त चा निर्णय होऊ शकतो का?केज च्या लहान मुले, महिला, वयस्कर नागरिक, आजारी नागरिक, ह्रदय चे रूग्ण यांची यातून मुक्तता होऊ शकेल का? डाॅल्बीच्या आवाजाने व त्यातून होणाऱ्या किरणाच्या ऊत्सर्जनाने डोळ्या वर होणारे दुष्परिणाम आपण रोकू शकतो.
प्रत्येक सण,जयंती उत्सव ही डाॅल्बी मुक्त झाली पाहीजे.
जर केज पोलीस प्रशासनाने शक्तींच्या बळावर डाॅल्बी मुक्त केज शहर चा निर्णय घेऊन केजकंराच आरोग्य जपावे असे केजचे नागरिक चर्चा करत आहेत.
