सुरज घुले संकल्पनेतून साकारले पंकजाताईंचे तैलचित्र !
महाकुंभ मधील अवस्मरणीय क्षणातील तैलचित्र पाहुन ताईसाहेब भरवल्या
सुरज घुलेंनी दिलेल्या अनमोल भेटीचे पंकजाताईंनी केले कौतुक
रोखठोक न्यूज: प्रतिनिधी
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचे “प्रयागराज” येथील महाकुंभ मेळ्यातील सहभाचा अवस्मरणीय तेजस्वी क्षणा ला मुर्तस्वरूप देण्याची संकल्पना ताईंचे खंदे समर्थक सुरज घुले यांनी मांडल्या नंतर सुप्रसिद्ध चित्रकार महेश पंडित यांनी प्रत्यक्षात पंकजाताई यांचे तैलचित्र हुबेहूब साकारले.हे तैलचित्र सुरज घुले हे पंकजाताई यांना मुंबई येथील त्यांच्या सरकारी बंगला रामटेक येथे भेट दिल्यानंतर अक्षरशः ताईसाहेब भारावून गेल्या.तसेच सुरज घुलेंनी दिलेल्या या अनमोल भेटीचे पंकजाताई मुंडे यांनी कौतुक केले.
दिल्लीतील सुप्रसिद्ध चित्रकार महेश पंडित यांच्याद्वारे ही पेंटिंग बनवण्यात आलेली आहे. महेश पंडित यांनी मा.राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी,पंतप्रधान नरेंद्र मोदीजी,गृहमंत्री अमित भाई शहा,अरुण जेटली अशा अनेक नेत्यांच्या पेंटिंग्स बनवलेल्या आहेत.पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचा “प्रयागराज” येथील महाकुंभ दरम्यानचा फोटो या पेंटिंगसाठी निवडण्यात आला होता.ही पेंटिंग ६ फुट उंच व ४ फुट रुंद आहे.पेंटिंग तयार करण्यासाठी कलाकारांना तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला.या पेंटिंगची संपूर्ण संकल्पना केज येथिल भाजपचे युवा नेते सुरज घुले यांची होती.त्यांनी १३ ऑगस्ट २०२५ रोजी रामटेक,मुंबई येथे मंत्री ना. पंकजाताई मुंडेना ही पेंटिंग भेट म्हणून दिली. भेटी दरम्यान महत्त्वाच्या विषयांवर मंत्री ना.पंकजाताई मुंडेशी सुरज घुले यांची चर्चा झाली.
•चौकट
सुरज घुले यांची संकल्पना ; मंत्री पंकजाताई मुंडेनां झाला आनंद
तैलचित्र फ्रेम तयार करून सुरज भैय्या घुले यांनी ना.पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दिला.”प्रयागराज’ येथील महाकुंभ दरम्यान फोटोचे तैलचित्र सुप्रसिद्ध चित्रकार महेश पंडित यांनी हुबेहुब साकारल्याबद्दल मंत्री पंकजाताई मुंडे यांनी चित्रकार महेश पंडित यांचे फोनवर बोलून कौतुक केले.इतकंच नाही तर हे तैलचित्र त्यांनी तातडीने त्यांच्या बंगल्यात लावलंही.तसेच ना.पंकजाताई मुंडेनी महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी खास राखून वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार सुरज भैय्या घुले यांनी व्यक्त केले.
