• Mon. Jun 15th, 2026

धनंजय मुंडेंकडून १० हजार रुपये वसूल करण्याचा खंडपीठाचा आदेश

Bybaba maske

Aug 16, 2025

धनंजय मुंडेंकडून १० हजार रुपये वसूल करण्याचा खंडपीठाचा आदेश

रोखठोक न्यूज वार्ताहर 

छत्रपती संभाजीनगर: माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या निवडणूक याचिकेसंदर्भात लेखी उत्तर दाखल करण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली होती; परंतु मुंडे यांच्याकडून लेखी उत्तर दाखल करण्यात आले नाही. या प्रकरणात मुंडे यांच्याकडून १० हजार रुपये वसूल (कॉस्ट-शास्ती) करून संबंधित रक्कम खंडपीठ वकील संघास द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. अरुण पेडणेकर यांनी दिला. पुढील सुनावणी १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. राजेभाऊ फड व करुणा मुंडे यांच्याकडून आ. मुंडे यांच्याविरुद्ध दोन स्वतंत्र निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. बोगस मतदान व शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप करीत मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकीतील निवडीला आव्हान दोन्ही याचिकांत देण्यात आले आहे. या याचिकांवरील सुनावणीवेळी न्यायालयाने मुंडे यांना नोटिसा बजावून म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला होता.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!