केज तहसील कार्यालयात तहसीलदारांचे बोगस स्वाक्षरी करणारे रॅकेट.
तहसीलदारांची बोगस स्वाक्षरी करणारे तहसील कर्मचारीच.
दलाल व तहसील कर्मचारीच मिळून करत आहेत कांड.
रोखठोक न्यूज वार्ताहर
केज तहसील कार्यालयात तहसीलदार यांची बोगस स्वाक्षरी करणारे रॅकेट असून त्यात दलालांचा सहभाग आहे.
केज येथील रजिस्ट्री कार्यालयात बोगस गुंठेवारी प्रमाणपत्र वापरून रजिस्ट्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून बोगस गुंठेवारीचे प्रमाणपत्र चक्क तहसीलदारांच्या बोगस स्वाक्षरीने तहसील कार्यालयातून वितरित करण्यात येत आहे या मध्ये केज मधील दलालांनी तहसील कर्मचारी,तलाठी,मंडलाधिकारी,रजिस्ट्री कार्यालयातील कर्मचारी,रजिस्ट्रार अधिकारी या सगळ्यांना पैश्याचे अमिश देऊन विकत घेतले आहे.त्यानुसार दलालांच्या कृती नुसार सगळे रॅकेट चालत असून यात वरिल कर्मचारीवर्गाचा सहभाग आहे.
आता तर चक्क केज तहसिलदार यांच्या बोगस स्वाक्षरीचे पत्र तयार करून त्या पत्राच्या आधारावर दोन जमिनीच्या रजिस्ट्री करण्यात आल्या आहेत. रजिस्ट्री कार्यालयात बोगस कागदपत्रे वापरून जर जमिनीची रजिस्ट्री होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब असून या बोगसगिरीमुळे अनेकांच्या जमिनीवर ही बोगसगिरीची टांगती तलवार लटकलेली आहे.अश्या किती बोगस गुंठेवारीचे प्रमाणपत्र काढून दलालांनी व तहसील कर्मचारीच यांनी मिळून शासनाचा किती महसूल बुडवला आहे याची चौकशी होणे गरजेच आहे
बोगस स्वाक्षरी कांडात तहसीलदार यांच्या अगदी जवळचे कर्मचारी असल्याचे “रोखठोक न्यूज” च्या चौकशीत समोर आले आहे.
जर तहसीलदारांकडून या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषी कर्मचारी व दलाल यांचे काळे कारनामे उघडकीस आणले नाहीतर मग “रोखठोक न्यूज” या दलालांचे व तहसील कर्मचाऱ्यांचे नावे उघड करील.
