• Fri. Sep 11th, 2026

कोर्टाच्या आवारातच सरकारी वकिलाने गळफास घेऊन केली आत्महत्या!

Bybaba maske

Aug 20, 2025

कोर्टाच्या आवारातच सरकारी वकिलाने गळफास घेऊन केली आत्महत्या!

रोखठोक न्यूज वार्ताहर 

येथील एका सरकारी वकिलाने वडवणी न्यायालयाच्या आवारातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. न्यायालयातील एका खोलीत ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

विनायक लिंबाजी चंदेल (वय-४८) असे आत्महत्या केलेल्या सरकारी वकिलाचे नाव असल्याचे कळते. आज सकाळी न्यायालयात चंदेल यांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली. वडवणी पोलीस ठाण्याच्या सपोनि वर्षा व्हागाडे घटनास्थळी पोहचल्या असून चंदेल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट देखील लिहिल्याचे कळते. पोलीस याप्रकरणाचा तपास करणार असून या घटनेमुळे मात्र जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आठ महिन्यापूर्वी आले होते वडवणीला.

 सरकारी वकील विनायक चंदेल आठ महिन्यापूर्वी वडवणी च्या न्यायालयात रुजू झाले होते. आठ महिन्यापासून ते सरकारी वकील म्हणून काम करताना त्यांची कारकीर्द देखील चांगली राहिली होती. आज सकाळी अचानक आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

baba maske

Related Post

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!