हारून इनामदार यांच्या जनविकास इन्फ्रास्ट्रक्चर ला वाचवण्या साठी हे कुभांड रचले का?
दलित म्हणवणारे, आरोप करणारे कार्यकर्ते हारून इनामदार यांचे.
रोखठोक न्यूज वार्ताहर
केज शहरात ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत वाजवून कपिल मस्के यांच्या वर आरोप करण्यात आले.पण या मागे हारून इनामदार यांचे समर्थक आहेत का!
कारण पहिलीच ही गायरान जमीन जनविकास इन्फ्रास्ट्रक्चर च्या नावाने बळकावली असल्याचे कागद पत्रावरून दिसत आहे.30/1 व 30/2 या दोन्ही ही क्षेत्रात केज चे नगरपंचायत चे स्वीकृत सदस्य हारून इनामदार यांनी गेल्या दहा वर्षा पुर्वीच तथाकथित गायरान धारक रमेश लांडगे, किसन लांडगे यांना हाताशी धरून येवता येथील केज च्या 30/1 व 30/2 बदल्यात ही गायरान जमीन अदलाबदल केली.
केज येथील 30/1 व 30/2 ही गायरान जमीन जनविकास इन्फ्रास्ट्रक्चर या आपल्या कंपनीच्या नावे खरेदी केली तसेच आपल्या कार्यकर्ते, जनविकास शिक्षण संस्थेत कर्मचाऱ्यांच्या नावे जमीन केली आहे.
याच गायरान जमीन वर काही वर्षा पुर्वी गरिब दलित जनतेने अचानक नगर उभा केले होत्या त्या वेळेस ही जमीन एका रात्रीत गुंडांना हाताशी धरून नेस्तनाबूत केली होती.त्या नंतर 2009/2010 ला पुन्हा गरिब दलित जनतेन येथे आपली वस्ती केली आहे आज त्याच गरिब दलित जनते साठी केज चे माजी नगरसेवक कपिल मस्के हे लढा देत आहेत, आज पर्यंत त्यांनी दोन वेळेस या गरिब दलित बांधवांना आपल्या हक्काची गायरान जमीन जी की त्यांनी आपला संसार त्या जागेवर मांडला आहे ती जमीन या धनदांडग्या लोकांपासून मिळवण्या साठी एक नव्हे तर दोन वेळेस आमरण उपोषण केले.तसेच माहिती अधिकार वापरून या गायरान जमीन बाबतीत सर्व माहिती मागवली आहे. त्यानुसार ते शासन,धनदांडग्या विरोधात आपली लढाई लढत आहेत. या प्रकरणात शासन हारून इनामदार यांच्या दबावाखाली खरी माहिती देत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या म्हणून त्या विरोधात कपिल मस्के हे 12 ऑगस्ट रोजी पुन्हा केज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत होते.उपोषणाच्या तिसऱ्या दिवसअखेर बीड जिल्ह्याचे दंबग खासदार बजरंग सोनवणे यांनी उपोषण स्थळी भेट दिली व मुद्दे वाईज तहसीलदार यांना प्रश्न ची माहिती विचारली त्या वेळेस तहसीलदार गडबडले व त्यांनी सांगितल की यात महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री हस्तक्षेप करत आहेत.त्या वरूण खासदार बजरंग सोनवणे यांनी तहसीलदार यांना चांगलेच झापले व तहसीलदार यांना प्रश्न केला की उपमुख्यमंत्री यांना फोन लावून विचारू का ? या प्रश्नावर तहसीलदार यांनी मौन बाळगले पण यातून केज तहसील प्रशासन व इतर प्रशासन वर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेऊन दडपण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.कारण कांही दिवसा पुर्वीच जनविकास परिवर्तन आघाडीचे स्वीकृत सदस्य हारून इनामदार, नगराध्यक्ष,व सर्व नगरसेवक यांनी राष्ट्रवादीत अजित पवार गटात प्रवेश केला होता.तो प्रवेश खरच ही गायरान जमीन बळकावण्या साठी तर नव्हता हा प्रश्न आज सर्व सामान्या समोर उभा रहात आहे.कारण तहसीलदार केज यांनी उपमुख्यमंत्री यांचा गायरान जमिनीत हस्तक्षेप केल्याचे खासदार बजरंग सोनवणे यांना सांगितले होते.तसा व्हिडीओ व्हायरल झाला होता,मग याच साठी हा अट्टाहास होता का.
त्यांनंतर उपोषण करते कपिल मस्के यांना उपोषण सोडताना खरी माहिती देण्याचे निर्देश केज तहसीलदार यांना खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्याने त्यांनी वस्तुनिष्ठ माहिती कपिल मस्के यांना दिल्याने, लगेच काही स्वयंघोषित दलित नेते जे की हारून इनामदार यांचे समर्थक आहेत त्यांना हाताशी धरून पत्रकार परिषद घेऊन कपिल मस्के यांची बदनामी होईल या पद्धतीने त्यांची ऑडिओ क्लिप प्रसार माध्यमातून प्रसिध्द केली व गायरान जमीन व तेथे बसलेले रमाई नगर च्या नागरिक ना संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.या सगळ्या प्रयत्नातून “कोंबडा झाकला तरी सुर्य उगवायचा रहात” नाही हे यांच्या लक्षात येत नसल्याची भावना आता जन सामन्यातून येत आहे. कपिल मस्के हेच आमची रमाई नगर वाचवू शकतात अशी भावना आता लोक बोलत आहेत. लवकरच दलितांचा मुखवटा पांगरणारे व जनविकास इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या नावे गोर गरिब दलितांची जमीन बळकावणारे हारून इनामदार यांचा बुरखा फाटणार आहे अश्या प्रतिक्रिया उमटत आहेत

