• Wed. Jun 3rd, 2026

बीड जिल्हा खूनाने पुन्हा हादरला. धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून 

Bybaba maske

Aug 27, 2025

बीड जिल्हा खूनाने पुन्हा हादरला.

धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून 

रोखठोक न्यूज वार्ताहर 

बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असून एका पाठोपाठ खूनाच्या घटनेने जिल्हात कायदा सुव्यवस्था आहे का नाही हा प्रश्न पडला आहे.गुन्हेगारांवर कसलीच पोलीसाांची वचक नसल्याचे दिसून येत आहे.

काल रात्री अंबाजोगाईतील रायगड नगर येथे राहणारा अविनाश शंकर देवकर (वय 35) याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारखाना रोडवरील दरबार हॉटेल येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात आरोपी दरबार हॉटेलमध्ये जाऊन हॉटेलमध्ये बसलेल्याअविनाश देवकर यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने सपासप वार केले व त्याचा जागीच मृत्यू झाला ही माहिती अंबाजोगाई शहर पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून अविनाश देवकर यांचा मृतदेह स्वराती रुग्णालय अंबाजोगाई येथे आणण्यात आला. या घटनेचे कारण स्पष्ट झाले नसून पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!