केजचा गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर रंगेल कारभार चवाट्यावर.
अल्पवयीन विद्यार्थीनीशी अश्लिल चाळे, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
ऑडिओ, व्हिडीओ व्हायरल,मुलीसोबत असलेली महिला कोण, कोणाच्या फोनवरून चर्चा झाली, मुलीला इतक्या लांब कशी नेले?
मध्यस्थी करणारा शिंदीचा नेता कोण?
रोखठोक न्यूज वार्ताहर
नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीला गाडीत बसवून पुढे रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत गाडी थांबवून तिच्याशी अश्लिल चाळे करणाऱ्या केजचा गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर (रा.उमरी रोडकेज) याच्या विरोधात केज पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान बेडसकर याने केलेल्या कृल्यानंतर
तर काही ऑडिओ क्लिप आणि व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली असून त्यामधील प्रकार पाहता रंगेल बेडसकर विरुध्द प्रशासनाने तात्काळ कारवाई करायी अशी मागणी होवू लागली आहे. बेडसकरमुळे शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेचे देखील बदनामी झाली असून या घटनेचा निषेध व्यक्त होवू लागला आहे. केज पोलिस ठाण्यात पिडित विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीत महटले आहे की, मी व माझी मानलेली मावशी आणि त्यांची लहान मुलगी असे आम्ही वाढदिवसाचा केक आणण्यासाठी गेलो असता, लक्ष्मण बेडसकर हे तिथे आले व चला तुम्हाला चहा, नाष्ट्या साठी घेऊन जातो म्हणून त्यांनी त्यानंतर गाडी शहरापासून काही अंतरावर नेवून रस्त्याच्या कडेला थांबवली आणि बेडसकर याने वाईट हेतूने माझा हात धरून अश्लिल कृन्य केल्याने आम्ही ओरडू लागलो. त्याचवेळी पाठीमागून एक कार येवून तिथे थांबली. कार थांबलेली पाहुन बेडसकर तेथून पळून गेला. त्या गाडीत माझे आई व इतर होते असे पिडीतेने तक्रारीत म्हटले आहे. लक्ष्मण बेडसकर याने केलेल्या कृत्याप्रकरणी पिडित विद्यार्थीनीच्या फिर्यादीवरून बेडसकर विश्ब्द कलम ७४,७५ (९), ७५ (२), ३५९(२) बीएसएआय कलम बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ आणि १२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी कार सोडून पळून गेल्याचे सांगण्यात आले असले तरी नंतर तो केज पोलिस ठाण्यात आला होता. मात्र पोलिसांनी तेथून जायला सांगितले. एकदोन नव्हे तर चार ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत त्यामध्ये साहेवांची गाडी कुठंय? असं एपीआय बोलत आहेत. त्यावरून पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.
ऑडिओ, व्हिडीओ व्हायरल
केजचा गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याने दि. १८ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास धारूर चौक ते चिंचपूर रोडवरून गाडी रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत थांबवली. या दरम्यान त्याने काय काय केले हे पिडित विद्यार्थीनीने तक्रारीत नमूद केले आहे. मात्र त्या आधी किंवा त्यानंतरचे बेडसकरच्या काही ऑडियो क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यामध्ये एक महिला लक्ष्मण बेडसकर या नावाचा उल्लेख करत असून समोरून बेडसकर ‘काल कुठे गेलतात, सोबत ते कोण होते’ असं विचारता, त्यावर महिला म्हणते मैत्रीण होती, काहो अवडतंय का? असे विचारत असल्याचे समोर आले आहे. या ऑडिओ क्लिप आणि सदरील प्रकारानंतर घटनास्थळाचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून त्यामध्ये एक महिला आणि अल्पवयीन मुलगी दिसून येत आहे. त्यांच्यासोबत गळ्यात आयकार्ड असलेला व्यक्ती देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे.
मुलीसोबत असलेली महिला कोण, कोणत्या फोनवरून चर्चा झाली, मुलीला इतक्या लांब कशी नेले?
गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर प्रकरणातील गंभीर खुलास्यांमुळे समाज आणि पालकांमध्ये संताप वाढला आहे. या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत ज्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. आरोपी लिंगपिसाट किंवा वर्तनाचा प्रकार केला होता का, अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला का, तसेच मुलगी इतक्या लांब कशी नेली गेली याबाबत तपास आवश्यक आहे. या दरम्यान, कोणाच्या फोनवरून प्रकरणाची चर्चा झाली, मुलगी तिकडे जात असताना नातेवाईकांना कसे माहीत झाले, याची माहिती गोळा करणे गरजेचे आहे. तसेच, अल्पवयीन मुलीसोब असलेली महिला कोण आहे, ती महिला खरोखरच तीची मावशी आहे का ? शिवाय तिचा व्यवसाय वेश्याव्यवसायाशी संबंधित आहे का, आणि संबंधित महिला पूर्वी अनेक अधिकारी, कर्मचारी व ग्राहकांसोबत ओळखीत होती का, हे सर्व संपूर्ण सखोल चौकशीच्या माध्यमातून उघड करणे अत्यावश्यक ठरेल.
राजकीय दबाव ! तडजोड करून आरोपी लक्ष्मण बेडसकरला तात्काळ सुटण्याची सोय केली ?
लक्ष्मण बेडसकरविरुद्ध गुन्हा दाखल करताना घडलेल्या घटनांमुळे स्थानिक समाज आणि नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. गुन्हा दाखल होईपर्यंत आरोपी लक्ष्मण बेडसकर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होता. केज पोलीस ठाण्याच्या आवारात तसेच शहरात नागरिकांमध्ये चर्चा आहे की, अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते प्रकरण दाबण्यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव आणत होते. तरीही, काही नागरिकांनी आर्थिक तडजोड करून आरोपीला तात्काळ सुटण्याची सोय केली. स्थानिकांचे मत असे आहे की, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना न्याय मिळेल, आणि त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची आशा निर्माण झाली आहे. बीड जिल्ह्यातील जनतेला हा निर्णय समाधानकारक वाटत असून, अनेक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते जर लेकी बाळीच्या प्रकरणांमध्ये अन्याय घडवल्यास बाहेर बसून व्यस्त असतील तर जनतेतून ती निषेध व्यक्त होत आहे. याशिवाय, स्थानिक चर्चा अशी आहे की, सिंधी गावातील एका मोठ्या नेत्याचा बेडसकरशी संपर्क असल्याची माहितीही समोर आली आहे, जी या प्रकरणाच्या खोलवर तपासणीसाठी महत्त्वाची ठरू शकते. तसेच अश्या प्रकरणात मध्यस्थ करणारा शिंदीचा तो नेता कोण याचीही चौकशी करणे गरजेच.
लक्ष्मण बेडसकरच्या मोबाईलचा सिडीआर काढा, महिलांचे आणि मुलींचे फसवणूक प्रकरण उघड येईल ?
गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकरच्या गंभीर आणि घृणास्पद कारवायांवर महिला आयोगाने त्वरित चौकशी करावी, अशी मागणी पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. आरोपीचे मोबाईल तपासणी केली तर कॉल डिटेल्समधून स्पष्ट होईल की त्यांनी कोणकोणत्या महिलांना फसवले, कोणकोणत्या अल्पवयीन मुलींना फसवले, आणि हे सर्व कोणत्या एजंटच्या माध्यमातून चालत होते. या माहितीवरून संपूर्ण सेक्स रॅकेटचा भांडाफोड होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. महिला आयोग यांनी सर्व संबंधित पुरावे त्वरित गोळा करून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बीडमध्ये शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकारी ज्या मुलींच्या सुरक्षिततेस धोका न निर्माण करत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई होईपर्यंत समाजाचा संताप थांबणार नाही.