• Sat. Apr 18th, 2026

वंचित बहुजन आघाडीचा विराट जन आक्रोश मोर्चा धारूर तालुक्यात संपन्न शेतकऱ्यांच्या, वंचित समाजाच्या आणि सामान्य जनतेच्या हक्कासाठी बुलंद आवाज.

Bybaba maske

Oct 9, 2025

वंचित बहुजन आघाडीचा विराट जन आक्रोश मोर्चा धारूर तालुक्यात संपन्न

शेतकऱ्यांच्या, वंचित समाजाच्या आणि सामान्य जनतेच्या हक्कासाठी बुलंद आवाज.

रोखठोक न्यूज वार्ताहर 

धारूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज प्रचंड उत्साहात विराट जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील शेतकरी, युवक, महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाविरोधात घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयात सादर केला. या मोर्चाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष इंजी. प्रशांत उघडे यांनी केले. मोर्चास वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, महासचिव मिलिंद घाडगे, युवक जिल्हाध्यक्ष बाबुराव मस्के, धम्मानंद साळवे, अंकुश जाधव, माजलगाव तालुकाध्यक्ष अशोक पोळ, समाधान गायकवाड, वडवणी युवक तालुकाध्यक्ष विनोद काकडे, युवा नेते प्रकाश उजगरे, बाळासाहेब उजगरे, कपिल उजगरे, राबवा उजगरे, शहराध्यक्ष आकाश गायसमुद्रे, अभिजीत वाव्हळ, धम्मा कासारे तसेच धारूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात अतिवृष्टी जाहीर करावी. शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० अनुदान देण्यात यावे. सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी. गायरान धारकांना सातबारा मिळावा. अनुसूचित जमातींची प्रलंबित जात प्रमाणपत्रे तात्काळ जारी करावीत. रमाई आणि पंतप्रधान गृहनिर्माण योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांना तात्काळ हप्ते द्यावेत. संजय गांधी, श्रावणबाळ, निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे पगार वेळेवर द्यावेत. अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या गावांचे पूल तात्काळ बांधावेत. या मागण्या प्रमुख होत्या. मोर्चात सहभागी झालेल्या शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर तसेच पक्ष कार्यकर्त्यांनी घोषणांनी वातावरण दणाणून सोडले. मोर्चाचे निवेदन तहसीलदारांना देऊन शासनाने या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. तालुक्यातील वंचित समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठीचा हा मोर्चा परिणामकारक ठरेल असे कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केला.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!