कोरडेवाडी येथील ग्रामस्थानी पोलिस ठाण्या समोर बैलगाडी पेटविली
रोखठोक न्यूज
गौतम बचुटे/केज :- बीड जिल्ह्यातील कोरडेवाडी तालुका केज येथे सहा दिवसा पासून धर्मवीर संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्रीताई राठोड या उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून त्यांच्या उपोषण आणि मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त गावकऱ्यांनी बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून तहसील कार्यालयाच्या आवारात बैलगाडीवर पेट्रोल टाकून बैलगाडी पेटवून दिली. आंदोलकांनी कोरडेवाडी
येथील साठवण तलाव मंजूर करावा. ज्ञानराधा बँकेच्या ठेवी परत देण्यात याव्या. तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रति हेक्टरी 50 हजार रु नुकसान भरपाई देण्यात यावी. या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
