• Sat. Apr 18th, 2026

“सत्तेत काँग्रेससोबत पाच वर्ष ‘मिठ्ठास’, आता त्यांनाच ‘हरामखोर’? हारून इनामदारांच्या वक्तव्याने केजमध्ये राजकीय भूकंप!” जर काँग्रेस भ्रष्ट होती, तर पाच वर्ष तिच्यासोबत सत्ता का उपभोगली?भर बाजारात काँग्रेस ची लक्तरे मांडली  जनतेचा पैसा लुटला जात होता, तर त्यावेळी आवाज का उठवला नाही?  सत्तेचा कार्यकाळ संपत आला म्हणूनच आता जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न?

Bybaba maske

Mar 31, 2026

“सत्तेत काँग्रेससोबत पाच वर्ष ‘मिठ्ठास’, आता त्यांनाच ‘हरामखोर’? हारून इनामदारांच्या वक्तव्याने केजमध्ये राजकीय भूकंप!”

जर काँग्रेस भ्रष्ट होती, तर पाच वर्ष तिच्यासोबत सत्ता का उपभोगली? भर बाजारात काँग्रेस ची लक्तरे मांडली.

 जनतेचा पैसा लुटला जात होता, तर त्यावेळी आवाज का उठवला नाही?

 सत्तेचा कार्यकाळ संपत आला म्हणूनच आता जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न?

रोखठोक न्यूज वार्ताहर 

केज नगरपंचायत समोर शेतकरी कामगार पक्षाचे नेते मोहन गुंड यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आज पाचवा दिवस लागला असताना, आंदोलन सोडवण्यासाठी आलेल्या हारून इनामदार यांच्या एका वक्तव्याने शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे.

आंदोलनादरम्यान बोलताना हारून इनामदार यांनी “हा घोटाळा मागील सत्ताकाळात झाला आणि ते हरामखोर होते” असे वादग्रस्त विधान केले. मात्र, स्थानिक राजकीय वर्तुळात हे वक्तव्य थेट काँग्रेस कडे निर्देश करणारे असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

कारण, केज नगरपंचायतीत गेली पाच वर्षे जनविकास आणि काँग्रेस यांची सत्ता एकत्र होती. “आपले शहर, आपले सरकार” या गोंडस घोषणेअंतर्गत ही सत्ता चालवली गेली. मग आता अचानक याच सहयोगी पक्षावर “हरामखोर” असा घणाघात का?

 जर काँग्रेस भ्रष्ट होती, तर पाच वर्ष तिच्यासोबत सत्ता का उपभोगली?

 जनतेचा पैसा लुटला जात होता, तर त्यावेळी आवाज का उठवला नाही?

 सत्तेचा कार्यकाळ संपत आला म्हणूनच आता जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न?

मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनात १४ विविध मागण्या मांडण्यात आल्या असून, घरकुल घोटाळ्यासह अनेक गंभीर मुद्द्यांवर प्रशासनाला जाब विचारला जात आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडूनच आपल्या सहयोगी पक्षावर आरोप होणे, हे जनतेच्या नजरेतून सुटलेले नाही.

राजकारणात सोयीनुसार भूमिका बदलणे नवीन नाही, पण सत्तेत राहूनच सहकाऱ्यांवर घाणेरडे आरोप करणे म्हणजे जनतेच्या विश्वासाशी केलेला खेळ नाही का, असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.

केजची जनता आता या दुटप्पी राजकारणाला कंटाळली असून, येणाऱ्या काळात या वक्तव्याचे गंभीर राजकीय पडसाद उमटणार, यात शंका नाही.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!