• Sat. Jun 13th, 2026

परळीच्या धर्मापुरीत गांजा विक्रेत्यावर एलसीबीची धडक कारवाई; 9.77 लाखांचा गांजा जप्त

Bybaba maske

Jun 12, 2026

परळीच्या धर्मापुरीत गांजा विक्रेत्यावर एलसीबीची धडक कारवाई; 9.77 लाखांचा गांजा जप्त

रोखठोक न्यूज वार्ताहर | परळी

परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धर्मापुरी येथे गांजाची चोरटी विक्री करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 20 किलो 340 ग्रॅम गांजा व इतर साहित्य असा एकूण 9 लाख 77 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार छापेमारीचे नियोजन करण्यात आले. सपोनि धनराज जारवाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह धर्मापुरी येथील आरोपीच्या घरावर छापा टाकला.

झडतीदरम्यान घरामध्ये 20 किलो 340 ग्रॅम गांजा तसेच गांजा विक्रीसाठी वापरण्यात येणारा इलेक्ट्रिक वजनकाटा आढळून आला. जप्त मुद्देमालाची किंमत 9,77,320 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 274/2026 नोंद करण्यात आला असून एनडीपीएस कायद्याच्या कलम 20 व 29 अन्वये शेख बाबुलाल अतार व वशिम बाबुलाल अतार, रा. धर्मापुरी, ता. परळी, जि. बीड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी

ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.कारवाईमध्ये:सपोनि धनराज जारवा पोहेकॉ दिलीप गित्ते पोहेकॉ भागवत शेलार पोहेकॉ दिपक खांडेकर मपोह स्वाती मुंडे चालक पोअं हराळे परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि मेंडके

 

 

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!