• Fri. Jun 19th, 2026

केज मधील उमरी येथे खवा फॅक्टरी वर अन्नसुरक्षा विभागाचा धडाकेबाज छापा; निकृष्ट दर्जाचे मिठाई साहित्य जप्त, ६.६८ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

Bybaba maske

Jun 18, 2026

केज मधील उमरी येथे खवा फॅक्टरी वर अन्नसुरक्षा विभागाचा धडाकेबाज छापा; निकृष्ट दर्जाचे मिठाई साहित्य जप्त, ६.६८ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

रोखठोक न्यूज वार्ताहर 

सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत बीड शहरातील एका मिठाई उत्पादन युनिटवर धाड टाकली. या कारवाईत निकृष्ट दर्जाचे व संशयित अन्नपदार्थ आढळून आल्याने तब्बल ६ लाख ६८ हजार ४०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. तुकाराम मुंडे यांनी १७ जून रोजी केलेल्या तपासणीत मिठाई निर्मितीसाठी वापरण्यात येणारे काही पदार्थ अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक परिस्थितीत साठवून ठेवले असल्याचे निदर्शनास आले. यानंतर विभागाने तात्काळ कारवाई करत संबंधित माल जप्त केला.

कारवाईदरम्यान लिक्विड ग्लुकोज, खुला खोवा, वनस्पती तूप (सूर्या गोल्ड), प्रीमियम गोल्ड हलवा (व्हाईट), प्रीमियम गोल्ड हलवा (ब्राऊन) आणि इंडियन स्वीट ट्रेडिशनल फूड स्वीट या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. प्राथमिक तपासणीत उत्पादन प्रक्रिया व साठवणुकीत गंभीर त्रुटी आढळल्याचेही समोर आले आहे.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने केली. शहरात सुरू असलेल्या या धडक मोहिमेमुळे निकृष्ट व भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर प्रशासनाचा करडा बडगा कायम राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!