• Fri. Sep 11th, 2026

केज नगरपंचायत काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदाचे दोन दावेदार? आदित्य पाटील शिक्षक मतदारसंघातून आमदारकी लढवणार? मग केजच्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी पशुपती दांगट यांच्या खांद्यावर?

Bybaba maske

Aug 29, 2026

केज नगरपंचायत काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदाचे दोन दावेदार?

आदित्य पाटील शिक्षक मतदारसंघातून आमदारकी लढवणार? मग केजच्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी पशुपती दांगट यांच्या खांद्यावर?

केज | रोखठोक न्यूज

आगामी केज नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी आदित्य पाटील की पशुपती दांगट? यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, काँग्रेसकडून अद्याप अधिकृत उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

एकेकाळी केज शहरात एकहाती सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसला मागील नगरपंचायत निवडणुकीत केवळ तीन नगरसेवक निवडून आणता आले. त्यामध्ये आदित्य पाटील, शितलताई दांगट आणि सोमनाथ गुंड यांचा समावेश होता. त्यानंतर काँग्रेसने जनविकास आघाडीसोबत हातमिळवणी करून नगरपंचायतीची सत्ता हस्तगत केली आणि काँग्रेसच्या वाट्याला उपनगराध्यक्षपद आले. शितलताई दांगट यांनी उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.

आता आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा आहे.

आदित्य पाटील आमदारकीच्या रिंगणात उतरणार?

राजकीय वर्तुळात सध्या एक महत्त्वाची चर्चा रंगली आहे. आदित्य पाटील हे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून आमदारकी लढविणार असल्यास, केज शहरातील काँग्रेसची धुरा पशुपती दांगट यांच्या खांद्यावर सोपविली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

जर ही राजकीय गणिते प्रत्यक्षात आली, तर नगराध्यक्षपदासाठी पशुपती दांगट यांचे नाव काँग्रेसकडून पुढे येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

मात्र दुसरीकडे, पशुपती दांगट काँग्रेसचा अधिकृत उमेदवार न ठरल्यास स्वतंत्रपणे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणार का? याचीही उत्सुकता केजकरांना लागली आहे.

दांगट यांच्या जनसंपर्काचा काँग्रेसला फायदा?

पशुपती दांगट यांच्यावर शहरातील मतदारांचा चांगला विश्वास असल्याची चर्चा असून त्यांचा जनसंपर्क आणि स्थानिक राजकारणातील प्रभाव काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वासमोर उमेदवार निवडताना अनुभव, जनसंपर्क आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता या तिन्ही बाबींचा विचार करावा लागणार आहे.

एकीकडे माजी नगराध्यक्ष म्हणून आदित्य पाटील यांचा अनुभव, तर दुसरीकडे पशुपती दांगट यांचा शहरातील संपर्क—यामुळे काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी ‘आदित्य की पशुपती?’ हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

आगामी नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने काँग्रेसने कोणाला मैदानात उतरवायचे, याचा निर्णय पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

आदित्य पाटील आमदारकीच्या मैदानात उतरणार की केजच्या नगराध्यक्षपदासाठी पुन्हा मोर्चेबांधणी करणार?

पशुपती दांगट पक्षासोबत राहणार की वेगळी वाट धरून मैदानात उतरणार?

या सर्व प्रश्नांची उत्तरे आगामी काळात स्पष्ट होतील.

काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाची ‘माळ’ अखेर कोणाच्या गळ्यात पडणार?

आदित्य पाटील की पशुपती दांगट?

याचे उत्तर येणारा काळच देणार!

रोखठोक न्यूज

जन सामान्याच्या अन्यायाविरोधात आवाज

baba maske

Related Post

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!