• Thu. Oct 22nd, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयासमोर उभ्या रुग्णवाहिकेची काच फोडली; १० हजारांचे नुकसान

Bybaba maske

Oct 17, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयासमोर उभ्या रुग्णवाहिकेची काच फोडली; १० हजारांचे नुकसान

रोखठोक न्यूज वार्ताहर | केज

केज येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेची काच अज्ञात इसमाने फोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित इसमाचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

रुग्णवाहिकेचे मालक प्रशांत नेहरकर यांच्या रुग्णवाहिकेची काच फोडण्यात आल्याने त्यांचे अंदाजे १० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेची काच फोडण्याचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित अज्ञात इसमाची ओळख पटवून त्याच्यावर कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!