• Sun. Apr 19th, 2026

राज्य सरकारने बीड जिल्ह्य़ातील शेतकऱ्याच्या तोंडाला पुसली पाने  

Bybaba maske

Sep 11, 2022

राज्य सरकारने बीड जिल्ह्य़ातील शेतकऱ्याच्या तोंडाला पुसली पाने

बीड जिल्ह्य़ातील शेतकर्यांना नुकसानभरपाईची दमडीही नाही.

-अतिवृष्टीसह नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानभरपाई साठी शेतकऱ्यांना राज्य शासनाने तीन हजार 501 कोटी 71 लाख 21 हजार रूपयांचा निधी वितरित केला आहे.मात्र या मदती पासुन बीड जिल्ह्य़ाला वगळले आहे. गोगलगायीमुळे 12 हजार हेक्टर पेक्षा अधिक शेतपिक बाधीत झालेली असताना या शेतकऱ्यानां दमडीही न दिल्याने शेतकरीवर्गात कमालीचा संताप राज्य शासना विरोधात व्यक्त होऊ लागला आहे मराठवाड्यातील आठ पैकी सहा जिल्ह्य़ात मदत जाहीर करण्यात आली त्यातून बीड जिल्ह्य़ाला का वगळण्यात आले असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.गोगलगायीच्या प्रादुर्भाव मुळे कापूस,सोयाबीन ही पिके उद्ध्वस्त झालेली आहेत,त्या मुळे विषेश बाब म्हणून बाधीत शेतकर्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरीवर्ग करू लागला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!