चिमुकल्याच्या गळ्यावर व मानेवर वार करून हत्या संशयित आरोपी अटक
परळी तालुक्यातील नागापूर कॅम्प येथे केज येथे राहणारी बहिण आई व भावाला भेटण्यासाठी आली असता ते सगळे शनिवारी रात्री घरातील सर्वजण एकत्र जेवण करून झोपले होते.सर्वजण झोपेत असताना एका चार वर्ष चिमुकल्याच्या गळ्यावर व मानेवर वार करून खून केलाची ही घटना आज रविवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहे.कार्तिक करंजकर (वय 4)असे मयत मुलाचे नाव आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार केज तालुक्यातील लाडेगाव येथील सुरेखा करंजकर या परळी तालुक्यात तीन दिवसांपूर्वी आई व भावाला भेटण्यासाठी नागापूर कॅम्पमध्ये आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा चार वर्षांचा मुलगा कार्तिकही होता.संशयित आरोपी हा त्याच्या आईला त्रास देत होता तसेच सुरेखा त्याला समजावण्यासाठी घरी आली होती. शनिवारी रात्री त्याला समजावत असताना दोन भावंडांमध्ये वाद झाला.त्यावरून आरोपींनी भाच्याची हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक नेरकर यांनी घटनास्थळी भेट दिली.