• Wed. Jun 3rd, 2026

गंगामाऊली कारखाना हा शेतकऱ्यांचे हित जोपासणारा कारखाना- अविनाश आदनाक  

Bybaba maske

Sep 11, 2022

गंगामाऊली कारखाना हा शेतकऱ्यांचे हित जोपासणारा कारखाना- अविनाश आदनाक

(तांबवा येथे उस विकास कार्यक्रम संपन्न)

 

केज दि.११(प्रतिनिधी)गंगामाऊली कारखाना हा शेतकऱ्यांचे हित जोपासणारा कारखाना- अविनाश आदनाक

गंगामाऊली शुगर ॲड अलाईड इंडस्ट्रीज केज हा कारखाना शेतकरी बांधवांचा तसेच सर्वांना सोबत घेऊन चालनारा कारखाना आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनी आता घाबरायची गरज नाही असे प्रतिपादन गंगामाऊली शुगर इंडस्ट्रीज केजचे मुख्य शेतकी अधिकारी अविनाश आदनाक यांनी केले.

            तालुक्यातील तांबवा येथे ऊस विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलताना म्हणले की, कारखाना क्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवडी संबंधी त्यांनी मार्गदर्शन केले तसेच कारखाना नियोजन पध्दती बाबतही त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली आगामी काळात 10001 या जातीच्या ऊस लागवडी संबंधी त्यांनी सविस्तर माहिती दिली.

           यावेळी गंगामाऊली शुगरचे ऊस पुरवठा अधिकारी हिरे, ऊस विकास अधिकारी सावंत, यांनीही मार्गदर्शन केले तसेच सोबत शेतकी विभागाचे भिसे व कृषी सहाय्यक आशिष सोनवणे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचा गावकरी बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच तांबवा गावचे सरपंच सदाशिव चाटे, जेष्ठ नागरिक .दिलीप चाटे, दिपक कराड व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 

 

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!