• Sun. Apr 19th, 2026

गॅस एजन्सी जोमात,पुरवठा अधिकारी कोन्यात.

Bybaba maske

Sep 12, 2022

गॅस एजन्सी जोमात,पुरवठा अधिकारी कोन्यात.

 तहसीलदार साहेब इकडे लक्ष द्या.

    केज शहरात गॅस पुरवठा करण्या साठी एच पी गॅस व भारत गॅस अश्या दोन पुरवठा धारक एजन्सी आहेत.पण यांचे घरगुती ग्राहका पेक्षा व्यावसायिक ग्राहकांना गॅस देण्यात जास्त आपुलकी आहे,केज शहरातील प्रत्येक हाॅटेल व जेथे जेथे गॅस चा उपयोग होतो त्या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर देण्या पेक्षा घरगुती वापराचे 14 किलोचे गॅस सिलिंडर पुरवले जाते ते पण बिनधास्त ना कोणाची भीती ना वचक उघड्यावर सिलेंडर ठेवून वापरले जाते. जर घरगुती व्यावसायिकाने गॅस बुक करून सुद्धा त्यांना गॅस दिला जात नाही,एक तर दोन्ही गॅस एजन्सी चे जेवढे डिलीवरी करणारे माणसे आहेत ते जास्त पैसे मिळविण्याच्या नादात हाॅटेल व्यावसायिक किंवा तत्सम लोकांना गॅस देतात.योगा योगाने जर डिलीवरी साठी कुणाच्या घरी आलेच तर किंमती पेक्षा पन्नास ते साठ रूपय जास्त मोजावे लागतात. सद्या गॅसचा भाव 1078 रू आहे वरून यांना पन्नास रूपय जास्त ऐवढी कस्टमर ची लूट चालली आहे.पन्नास रूपय जास्त कश्याचे विचारले तर मग एजन्सीत येऊन गॅस घेऊन जा असा उद्धट सवाल आपल्यालाच करतात.

    या सर्वावर अंकुश ठेवणारी संस्था गाड झोपल्या मुळेच यांच फावत.अजून एखदा ही ऐकले किंवा निदर्शनास आले नाही की एवढे राजरोस पणे व्यावसायिक घरगुती गॅस वापरत असताना एखादी कारवाई झाली आहे.

  अहो साहेब एखादी कारवाई करून तर बघा!! असे तालुक्यातील जनता म्हणू लागली आहे.

  तळटीप….जर यांनी रोज शंभर गॅस डिलिव्हर केले एका गॅस ला पन्नास रूपय जास्त तर यांची दिवसभराची एका डिलिव्हर माणसाची कमाई किती?

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!