केज कृषी कार्यालाकडील झेरॉक्सचे थकीत बिलाची वारंवार मागणी करूनही कार्यालय बिल द्यायला उशीर करत असल्याने कंटाळलेल्या दुकानदाराने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केज येथील अंबादास गणपतराव गायके यांचे कृषी कार्यालयालगत असणारे पंकज झेरॉक्स अॅन्ड कॉम्प्युटर सेंटर यांच्याकडून कार्यालयीन कामकाजासाठी लागणाऱ्या झेरॉक्स काढुन देण्याचे कामकाज करतात. सन 26/9/2021 ते 2/9/2022 पर्यंतचे एकूण 1,17,835 रुपये झेरॉक्स बिल कार्यालयाकडे थकीत आहे त्याची मागणी कार्यालयाकडे वारंवार करण्यातही आलेली आहे.झेरॉक्स बील मिळावे याबाबतीत बऱ्याच वेळा अर्ज देखील करण्यात आला आहे.मात्र त्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,ते कार्यालयीन कामकाजासाठीच झेरॉक्स काढून देण्याचे कामकाज करत आहेत,कारण दुकान आतील बाजुस असल्याने बाहेरील गिराईकाचा कोणताही फायदा होत नाही त्यामुळे मला एकही रुपयाचेही काम बाहेरुन मिळत नसल्याने माझे सर्व आपल्या कार्यालयाच्या कामकाजावर बिलावरच अवलंबुन असल्यामुळे दुकानाचा किराया जवळच्या खिशातून भरत आहे . त्यामुळे माझ्या कुटुंबावर उपसमारीची वेळ आली असुन आपल्या कार्यालयाकडे प्रलंबीत असलेल्या थकीत देयकापैकी दोन चार महीन्याला समजुत काढीत होते .पण अदयापही मला एकही रुपया मिळाला नाही ही अत्यंत खेदजनक बाब आहे.झेरॉक्स बिल एकूण 1,17,835 बाकी बिल मिळालेले नाही. घरखर्चासाठी व दवाखान्यासाठी आईच्या आजारासाठी पैशाची खूप गरज आहे.आईला मणक्याच्या आजार आहे त्यामुळे पैस्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्वरित बिल मिळावे अन्यथा आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी कृषी कार्यालायला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
चौकट :- स्वतःच्या कष्टाचे हक्काचे पैसे मिळावेत म्हणून कार्यालयाकडे विनवणी करावी लागते आहे.आमरण उपोषणाला बसावे लागत असेल तर ही खेदाची बाब आहे.कार्यालय म्हणते की,वरिष्ठांकडे मागणी केली आहे.पण अजून किती दिवस की वर्षे वाट पहावी लागणार आहे.झेरॉक्स चे बिल देण्याइतपत कार्यालयाकडे निधी नाही का फक्त झेरॉक्स बिल द्यायलाच निधी नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.- अंबादास गायके