लंम्पी पशु आजारा मुळे होतोय शेतकरीवर्ग परेशान पशुवैद्यकीय दवाखाना सापडता
लंम्पी पशु आजारा मुळे होतोय शेतकरीवर्ग परेशान
केज पशुवैद्यकीय दवाखाना तालुका श्रेणी-1 मध्ये येतो त्या साठी बीड-अंबाजोगाई रोड वर मोठी इमारत बांधण्यात आली आहे.राज्यात लंम्पी चर्मरोगाचा संसर्ग वाढला आहे त्यासाठी समस्त शेतकरीवर्ग चिंतेत आहे त्यामुळे पशु चे काही दुखत असेल तर ते लगेच तालुक्यातील दवाखान्यात येतात पण केज मध्ये आल्या नंतर त्यांना दवाखाना सापडता सापडत नाही चौकशी करत यावे लागते कारण अतिक्रमणांच्या विळख्यात दवाखाना कुठे आहे हे दिसत नाही,दवाखान्याच्या सभोवताल वेड्या बाभळीच विळखा,अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्यांची पार्किंग, कचऱ्याचे ढीग,मुतारी,उघड्यावरची हगणदारी व रात्री अंबट शौकिनांची रेलचेल.
असा असणारा पशुवैद्यकीय दवाखाना अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त होऊन चांगल्या सुविधा मिळाव्यात व मोकळ्या जागेत शहरात मोकार ट्रॅफिक अडवून फिरणाऱ्या जनावर व भाकड जनावरा साठी तिथे सरकारकडून गोशाळा उभारण्यात यावी असी मागणी शहरवासी करू लागले आहेत.