• Fri. Jun 19th, 2026

केज-बीड रोडवर कोरेगाव जवळ अपघात : दोन ठार एक गंभीर

Bybaba maske

Sep 24, 2022
  • केज-बीड रोडवर कोरेगाव जवळ अपघात : दोन ठार एक गंभीर 

अपघातग्रस्तांना केली भाजपचे नंदकिशोर मुंदडा, प्राध्यापक डॉक्टर विजय ठोंबरे आणि भगवान केदार व बालाजी तांदळे यांनी मदत

गौतम बचुटे/केज :- केज बीड रोडवर एक मोटार सायकल आणि शाळेच्या गाडीचा अपघात होऊन त्यात मोटार सायकल वरील दोन ठार तर एक गंभीर जखमी झाले आहेत.

केज-बीड रोडवरील कोरेगाव जवळ शनिवार दि. २४ सप्टेंबर रोजी दुपारी २:०० वा. च्या दरम्यान बन्सल क्लासेसच्या रस्त्यात उभ्या असलेल्या गाडी क्र. (एम एच-४४ /९९९६) ला मोटार सायकलीने क्र. ( एम एच -१३/बी जे ८५७४) ने जोराची धडक दिली. यात मोटार सायकलवरील सुनील मधुकर शिंदे वय (२५ वर्ष) रा. पिंपळगाव ता. केज हा उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू पावला तर भागवत कल्याण पवार वय (२२ वर्ष) आणि दिपक कल्याण पवार वय (२० वर्ष) हा सुद्धा ठार झाला आहे रा. कोरेगाव ता. केज यांच्या डोक्याला व छातीला मार लागला असल्याने गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान या रस्त्याने प्रवास करीत असलेले स्व लोकनेते गोपीनाथ मुंडे सहकारी सुतगिरणीचे चेअरमन प्रा. डॉ विजयकुमार ठोंबरे, भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान केदार, राष्ट्रवादीचे नेते बालाजीतांदळे आणि रिपाइंचे गौतम बचुटे यांनी रस्त्यात थांबून पोलीस दवाखाना व रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. जखमींना रुग्णवाहिका चालक मकरंद घुले यांच्या मदतीने आणि एका खाजगी कार चालकाने जखमींना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात हलविले. जखमींची त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना केज येथील उपजिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे हलविले आहे.

baba maske

Related Post

नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा फटका? रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्याला आग; खाजगी टिप्पर जळून खाक कित्येक दिवस कचरा न उचलल्याचा आरोप; नागरिकांमध्ये संताप, नुकसानभरपाईची मागणी
“आणखी किती बळी घेतल्यावर जागे होणार शासन?”माजलगाव-तेलगाव मृत्यूमार्ग ठरला; रस्त्यावरील भेगेने घेतला आणखी एका महिलेचा जीवनिष्काळजी प्रशासन आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
अंबाजोगाईत गुंडगिरीचा कळस! बारावीच्या विद्यार्थ्यावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला; डोक्यात दांडक्याचे घाव, प्रकृती चिंताजनक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!