• Fri. Jun 19th, 2026

केज तालुक्यातील अवैध्य धंदे बंद करा-वंचित बहुजन आघाडीचे केज तहसीलदार यांना निवेदन

Bybaba maske

Sep 24, 2022
  1. केज तालुक्यातील अवैध्य धंदे बंद करा-वंचित बहुजन आघाडीचे केज तहसीलदार यांना निवेदन

  2. पोलिस प्रशासन ने सोमवार पंर्यत कारवाई केली नाही तर मंगळवारी पोलिस अधीक्षक साहेबांना भेटून पुढील पाऊल उचलले जाईल असे वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

अवैध धंद्यांनी गाठला कळस,पोलिस प्रशासन करतय कानाडोळा 

केज/प्रतिनिधी

खुलेआम मटका,जुगार,गुटखा विक्री वाढली
केज ग्रामीण भागात व शहर परिसरात व संपूर्ण तालुक्यातील सर्वच गावात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे बोकाळले असून त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.तर तालुक्यातील अवैध धंदे हायटेक पद्धतीने सुरु करण्यात आले.
 तसेच तालुक्यात काही ठिकाणी सर्वात जास्त मटका,जुगार,गुटखा जोराने सुरु आहे. या सर्व अवैध धंद्यांवर पोलिस प्रशासनाच्या वतीने मात्र दूर्लक्ष होतांना दिसून येत आहे.तसेच तालुक्यात आणि शहरात चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून कोणतीच मोठी कारवाई होतांना दिसत नाही. जिल्ह्यात सर्वात जास्त केजतालुक्यात अवैध धंदे जोरदार सुरु आहे.बीड पोलिस अधिक्षक लक्ष देतील का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
खुलेआम अवैध प्रवासी वाहतूक,अवैध दारू, अवैध मटका,जुगार,अवैध वृक्षतोड अवैध रेती उपसा चोरी आदी व्यवसाय मोठ्या प्रमाणात बळावले आहे.मात्र संबंधित शासकीय यंत्रणा डोळे बंद करून आहे.कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने अवैध धंदेवाल्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.यामध्ये आर्थिक हितसंबंध गुंतले असल्यामुळे हा सर्व प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे दिसते.अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे.तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध वाहतूक केली जाते.तसेच गाडीचालक नियमबाह्यरीत्या प्रवासी कोंबून भरधाव वाहने दामटतात.यातून अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रवाशांचा जीवही धोक्यात आला आहे.तालुक्यात अवैध धंदे जोरदार सुरु आहे.प्रशासन व पोलीसांचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.केज तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी
वंचित बहुजन आघाडीचे बाबासाहेब अंबादास मस्के, केज शहर अध्यक्ष, उत्तम वाघमारे केज शहर उपाध्यक्ष,धनराज सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष,शिवाजी ठोके,सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते
चौकट:-केज मध्ये गुटखा,मटका किंगची हवा ,केज तालुक्यात नावाला मटका,गुटखा बंद ,पण खुलेआम चालू.
पोलिस प्रशासन ने सोमवार पंर्यत कारवाई केली नाही तर मंगळवारी पोलिस अधीक्षक साहेबांना भेटून पुढील पाऊल उचलले जाईल असे वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

baba maske

Related Post

नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा फटका? रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्याला आग; खाजगी टिप्पर जळून खाक कित्येक दिवस कचरा न उचलल्याचा आरोप; नागरिकांमध्ये संताप, नुकसानभरपाईची मागणी
“आणखी किती बळी घेतल्यावर जागे होणार शासन?”माजलगाव-तेलगाव मृत्यूमार्ग ठरला; रस्त्यावरील भेगेने घेतला आणखी एका महिलेचा जीवनिष्काळजी प्रशासन आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
अंबाजोगाईत गुंडगिरीचा कळस! बारावीच्या विद्यार्थ्यावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला; डोक्यात दांडक्याचे घाव, प्रकृती चिंताजनक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!