मुंबई – राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांची बीडचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे.राज्य शासनाने पालकमंत्री यांची यादी जाहीर केली.चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.