पंकजाताई मुंडे यांचा भाजपचे सरचिटणीस दत्तात्रय धस यांच्या वतीने सत्कार !
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :- केज भाजपचे जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय धस यांच्या वतिने भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.
भाजपच्या केंद्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे या बीड येथील ऊसतोड मुकादमांचा मेळावा आटोपून परळी येथे जात असताना शनिवार दि. २४ सप्टेंबर रोजी रात्री ९:०० वा. शिवाजी चौकातील भगवान मेडिकल समोर भाजपचे बीड जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय धस यांनी पंकजाताई मूंडे यांचा सत्कार केला.
यावेळी भवजपाचे तालुका अध्यक्ष भगवान केदार, विवेक केदार, महेश राख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दत्तात्रय धस यांनी संवाद पंकजाताई मुंडे यांच्याशी संवाद साधताना दसऱ्याला सावरगाव येथील मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.