• Sun. Apr 19th, 2026

पोलीस अधीक्षक साहेब कुठे तरी हे थांबले पाहीजे!

Bybaba maske

Sep 25, 2022

पोलीस अधीक्षक साहेब कुठे तरी हे थांबले पाहीजे!

 

कशी घडवणार आहोत नवीन पिढी?

 

काय वाढतायत ताटात याचा विचार आता झाला पाहिजे. किती दिवस जे मागच्याने केलः तेच आपण करणार आहोत,एक पिढी बरबाद झाली आहे,दुसरी मार्गावर आहे.मी म्हणत नाही यात पालकाचा दोष नाही त्यांचा सुद्धा आहे पण तेवढाच प्रशासनाचा सुद्धा आहे.जे ब्रिद वाक्य घेऊन तुम्ही या देशाची सेवा करताय त्या सिंघम मधल्या डाॅयलागची आठवण येते,’अगर पोलीस ने सोचा तो मंदिर के बाहर से एक चप्पल तक चोरी नही हो सकती’ बरोबर आहे साहेब एक वेळेस हा विचार करून बघाच.सगळ्या जिल्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे ,मटका म्हणून नका दारू म्हणून नका नशेच्या गोळ्या,तलवारी दादालोक,वाळूचोरी जे नाही ते..यात नवीन पिढी गुरफटत चाललीय एक अजस्र अजगराच्या विळख्यात!पावला पावलावर अवैध दारूचे ठेले,मटक्याच्या बुक्या, अवैध गोवा दारू,बनावट दारू काय नाही सगळ आपल्या जिल्यात…साहेब शहर सोडा खेड्या पाड्याच्या प्रत्येक टपरीवर, धाब्यावर दारू भेटू लागली आहे.बार मालक स्वतःची चारचाकी गाडीत, दुधाचा रतीब वाटतात तसे दारू प्रत्येक धाब्यावर,टपरीवर वाटत फिरतात ऑर्डर प्रमाणे,त्याच टपरीच्या बाजूला मटक्याची बुक्की,दारूत पैसा घालवून आले की, मटक्याच्या बुक्कीत बरबाद होयच,साहेब सांगा बर आज पंर्यत किती लोक मटक्यात श्रीमंत झालेत. साहेब चैन करायला पैसे भेटेना म्हणून मुले मोबाईल चोरी,बाईकचोरी,कडे वळू लागली आहेत हे यंग जनरेशन बिघडण्यात याचा वाटा खुप मोठ आहे साहेब.ही अशी जनरेशन देणार आहोत का आपण?पन्नास वर्षां पुर्वी सुद्धा, दारू पिऊन मटक्यात सर्व पैसे गमावलेला बाप काळी पिशवी घेऊन डूलत येत होता,आता त्याचा मुलगाही तसाच येतो.काहीच बदले नाही.तुम्ही पोलीस प्रशासनाने विचार केला तर हे बदल घडवून आणू शकतात.साहेब पोलीस अधीक्षक म्हणून मनावर घ्या साहेब या समाजावरच एवढ ओझ उतरवा बीड जिल्या आपला कायम आभरी राहील.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!