• Sun. Apr 19th, 2026

महावितरण कार्यालयाने नेमून दिलेल्या रिडींग गुत्तेदाराकडुन सर्वसामान्य जनतेची फसवणूक

Bybaba maske

Sep 25, 2022

महावितरण कार्यालयाने नेमून दिलेल्या रिडींग गुत्तेदाराकडुन सर्वसामान्य जनतेची फसवणूक

 

ऑनलाइन पद्धतीने तक्रार दाखल कार्यकारी अभियंता महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय येथे

 

केज तालुक्यातील साळेगाव गावासोबत असंख्य गावातील विज ग्राहकाचे पिळवणूक सुरु .केज उपविभागांतर्गत येणाऱ्या साळेगाव तालुका केज जिल्हा बीड येथील रिडींग गुत्तेदार चुकीच्या पद्धतीने रिडींग वाढवुन सर्व सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक वाढीव विज बिल देऊन सत्कीची वसुली तसेच विज चोरांना अभय देत आहे. त्याची कोणीही दखल घेत नाही .नागरिकांची होणारी फसवणूक थांबवुन रिडींग गुत्तेदाराची चौकशी करुन त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे.तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या महवितरण महावितरणच्या कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात यावी लवकरात लवकर रेडींग गुत्तेदारावर कारवाई करून त्यांना काळे यादीत टाकण्यात यावे अन्यथा केज महावितरण उपविभागाच्या कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आव्हान स्वराजवादी बहुजन महासंघ राष्ट्रीय सचिव विशाल सरवदे यांनी केले आहे.महावितरण कार्यालयाकडून रिडींग टाकण्याचे टेंडर घेतले आहे का गोरगरीब कष्टकरी नागरिकांची पिळवणूक करण्याचे टेंडर घेतले आहे का हाच प्रश्न उपस्थित होत आहेत.महावितरण कार्यालया तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!