• Sun. Apr 19th, 2026

साळेगांव येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचे उदघाटन*  

Bybaba maske

Sep 26, 2022

*साळेगांव येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचे उदघाटन*

 

 

गौतम बचुटे/केज महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजनेचे उदघाटन सरपंच कैलास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

या बाबतची माहिती अशी की, राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने दि.२६ सप्टेंबर ते दि. ५ ऑक्टोबर या कालावधीत माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याचे उदघाटन साळेगांव ता. केज येथे सरपंच कैलास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला उकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली बुदगुडे, उपसरपंच अमर मुळे, रवींद्र जोगदंड, श्रीमंत गित्ते, गौतम बचुटे आणि आरोग्य पर्यवेक्षक काळे, यशवंत मस्के आणि श्रीमती सिरसाट हे उपस्थित होते.

या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली बुदगुडे यांनी सांगितले की, या अभियानामध्ये साळेगांव उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात १८ वर्षा वरील महिला, बालके व गरोदर माता यांना पुर्णपणे मोफत सेवा देण्यात येणार आहेत. या अभियानाच्या संपुर्ण कालावधीमध्ये तज्ज्ञ डॉक्टरा मार्फत गरोदर महिलांची तपासणी. गरोदर महिलांची शारीरीक तपासणी. यामध्ये वजन, रक्तदाब, हिमोग्लोबीन, रक्तगट. सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्या, सोनोग्राफी तपासणी करण्यात येणार आहे. १८ वर्षावरील विवाहितांचे गर्भधारणापुर्व काळजी, मासिक पाळी मधील समस्या, सॅनिटरी पॅडसचा वापर, मासिक आरोग्य या विषयी समुपदेशन करण्यात येणार आहे. ३० वर्षा वरील सर्व महिलांची रक्तदाब, मधुमेह व कर्करोगा संबंधी तपासणी करण्यात येणार आहेत. क्ष – किरण तपासणी. बालकांचे लसिकरण तसेच कोविड लसिकरण .यासह दिव्यांग लाभार्थीना अपंगत्वाचे प्रमाणपत्र व युडीआयडी क्रमांक देण्यात येणार आहे. तसेच नेत्र तपासणी करून उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. शालेय आरोग्य तपासणी पथका मार्फत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी. यामध्ये टंगटाय, फायमोसिस, सिस्ट व इतर लघु शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तेव्हा उपकेंद्रातील सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला गरोदर माता, अंगणवाडीताई, मदतनीस आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!