परजिल्ह्यातून शेकडो मजूर केज तालुक्यात वास्तव्याला!
वाटमारी,मोटारसायकल चोरी चे प्रमाण वाढले
रोखठोक न्युज
केज : मागील अनेक दिवसांपासून केज युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर भरदिवसा घरफोड्या, चोरीच्या घटना घडत असताना चोरांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यातच परजिल्ह्यातून विविध कामांसाठी शेकडो मजुरांनी केज तालुक्यात वास्तव्य केले असून पोलीस ठाण्यात, ग्रामपंचायतीकडे नोंद असणे बंधनकारक असताना कुठेच नोंद नसल्याने व वाढत्या घरफोड्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
शेतकरी शेती कामात व्यस्त असताना इकडे चोरटे घर साफ करीतपरजिल्ह्यातून कामासाठी वास्तव करीत असलेल्या मजुरांनी इतर जिल्हात गेले तर त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात, ग्रामपंचायतीकडे किंवा नगरपंचायतीकडे नोंद करणे अवश्यक असते; पण या शेकडो मजुरांची कुठेच नोंद नाही. त्यातच तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून भरदिवसा घरफोड्याचे प्रमाण वाढले
या घरफोड्याचा तपास लागत नाही. त्यातच बाहेर जिल्ह्यातून केज तालुक्यात वास्तव करीत असलेल्या लोकांची नोंद ठेवण्याकडे पोलीस,नगरपंचायत ग्रामपंचायत का दुर्लक्ष करीत आहे हे न उलडगणारे कोडे आहे.