• Wed. Jun 3rd, 2026

केज येथे रिपाइंचे धरणे आंदोलन

Bybaba maske

Sep 27, 2022

केज येथे रिपाइंचे धरणे आंदोलन

                 

 

 

 केज तहसील कार्यालया समोर रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीपान हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका अध्यक्ष सुनील हिरवे यांच्या नेतृत्वाखाली गायरान जमीनींच्या अदला बदलीच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आले.
केज शहरातील सर्वे नंबर ३०/१ व ३०/२ मध्ये शासनाची फसवणूक करून चुकीच्या पद्धतीने गायनधारक यांना जमीन देण्यात आले आहेत. त्या जमिनीचे अदला बदल करण्यात आले आणि चुकीच्या पद्धतीने त्या जमिनीच्या भू-माफियांनी रजिस्ट्री केलल्या आहेत. त्या अशा बनावट आणि खोट्या रजिस्ट्री आधारे फेर घेण्यात येऊ नये व त्या गैरप्रकारची चौकशी करावी. त्या जागेचे झालेले अदला बदल रद्द करण्यात यावे. व नगरपंचायतने केलेल्या झोपडपट्टी सर्व्हेक्षण करून ते प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावे. या सर्व मागण्यासाठी केज तहसील कार्यालयावर रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीपान हजारे यांच्या आदेशाने तालुका अध्यक्ष सुनील हिरवे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संदीपान हजारे आणि रिपाइंचे जेष्ठ नेते महेंद्र निकाळजे यांनीही आंदोलनाला भेट दिली.
या आंदोलनात अमोल मस्के, सचिन ठोकळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि रमाई नगर मधील महिला व अतिक्रमणधारक सहभागी झाले होते. दरम्यान या आंदोलनाला माजी नगरसेवक कपिल मस्के, जलालोद्दीन शेख, शेखर सिरसट यांनीही भेट देऊन आंदोलनाला पाठींबा दिला.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!