पंचायत समितीनेच बांधून द्यावी:पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ग्रामीण डेमो प्रोजेक्ट चे घर बघून जनतेतून मागणी.
केज पंचायत समिती अंतर्गत पंचायत समीती आवारात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ग्रामीण साठी एक डेमो हाऊस बांधले आहे,त्या डेमो हाऊस चे बांधकाम लगातार पाया पासुन छता पंर्यत एका दमात म्हणजे ना पैश्याची अडचण ,किंवा दोन, तिन टप्प्यात येणारे पैश्याचे टेन्शन.अश्या कुठल्याच अडचणी चा सामना पार करण्याची गरज पंचायत समतीच्या या विभागाला आले नाही.तसेच डेमो हाऊस तर बांधले पण त्या साठी डेमो हाऊस बांधण्या साठी किती रक्कम लागली तेवढी रक्कम लिहीने गरजेचे होते कारण लाभार्थी ला ते कळणे गरजेचे होते.एकून घरकुल लाभधारकाणा दिड लाख रूपया पंर्यत घर बांधण्या साठी पैसे दिले जातात,जाग दाखवणे,बेसमेंट झाल्यावर एक हप्ता लेंटल लेवल ला एक हप्ता,छत पडल्या नंतर एक हप्ता, शौचालय मंजूर असेल तर त्याच वेगळ प्रोसेस,महात्मा गांधी रोजगार हमीच वेगळ बील,एवढे दिव्य पार केल्या नंतर दिड लाख रूपय भेटतात.खरच होत असेल का दिड लाखात घर? जर दिड लाख रूपय घरकुलास देत असेल तर पंचायत समीतीने जो डेमो हाऊस ,पंचायत समीतीच्या आवारात बांधले आहे, त्याचा हिशोब त्यानी डेमो हाऊस वर अधोरेखित करावा व डेमो हाऊस बरोबर दिड लाखात घरकुल कसे बांधावे याचा सुद्धा डेमो देण्यात यावा. नाहीतर प्रत्येक घरकुल डेमो प्रमाणे पंचायत समितीने बांधुन द्यावीत ही मागणी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत येणाऱ्य लाभार्थ्यांकडून होत आहे.