• Fri. Jun 5th, 2026

साळेगांव येथे मटका बुक्कीवर पोलिसांची धाड !

Bybaba maske

Sep 29, 2022

साळेगांव येथे मटका बुक्कीवर पोलिसांची धाड !

 

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील साळेगांव येथे मटका बुक्कीवर पोलिसांनी धाड टाकून मटक्याचे साहित्य व मुद्देमाल जप्त केला.
या बाबतची माहिती अशी की, साळेगांव ता. केज येथे गणेश कृषि सेवा केंद्रा समोर सखाराम लाला जगताप हे कल्याण नावाचा मटका घेत असल्याचे निदर्शनास आल्यावरून मंगळवार दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३:०० पोलीस नाईक राजू गुंजाळ, पोलिस नाईक चंद्रकांत काळकुटे आणि पोलिस नाईक बजरंग इंगोले यांनी छापा मारला. त्या वेळी सखाराम जगताप हे कल्याण नावाचा मटका घेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून मटक्याच्या साहित्यासह नगदी १ हजार २१० रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
पोलीस नाईक बजरंग इंगोले यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्या नुसार गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!